ई-बुकद्वारे सावित्रीबाईंना आगळीवेगळी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:00 AM2019-03-10T00:00:19+5:302019-03-10T00:01:04+5:30

कृतज्ञतापर साहित्याची जुळवणी; नंदिनी सोनवणे यांचा उपक्रम

Various tributes to Savitribai by e-book | ई-बुकद्वारे सावित्रीबाईंना आगळीवेगळी श्रद्धांजली

ई-बुकद्वारे सावित्रीबाईंना आगळीवेगळी श्रद्धांजली

googlenewsNext

- स्नेहा पावसकर 

ठाणे : तत्कालीन समाजाचा विरोध पत्करत स्वत: शिकून आणि महिलांच्या शिक्षणासाठी अखंड प्रयत्न केलेल्या सावित्रीबाई फुले यांचे ऋण न फेडता येण्यासारखेच. परंतु, त्यांचे जीवनचरित्र प्रत्येकाने वाचावे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने ठाणेकर नंदिनी सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याप्रती श्रद्घांजली व्यक्त करणाऱ्या लेखांचे संकलन करण्याचे ठरवले.

राज्यभरातून आलेल्या लेखांचे मिळून ‘महागीता क्रांतीज्योती सावित्रीमाई म.ज्योतिबा फुले’ हे ई बुक तयार करण्याचे काम केले सुरू असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नोंद हाय रेंज बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. रविवारी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनीच सोनवणे यांना या उपक्रमासाठी पुणे येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

एका मासिकासाठी सावित्रीबाई फुलेंवर आधारीत लेख लिहित असतानाच समाजातील प्रत्येक घटकाने सावित्रीबार्इंना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे, असा विचार सोनवणे यांच्या मनात आला. सोशल मीडिया, साहित्य चळवळ, संस्थांच्या माध्यमातून त्यांनी लेख पाठवण्याचे आवाहन केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १५०० लेख, कविता, त्यांच्या आयुष्याशी निगडीत सनावली असे लेखन सोनवणे यांच्याकडे आले. ते सर्व साहित्य सोनवणे यांनी एकत्र केले असून त्याचे ईबुक लवकरच प्रकाशित होणार आहे. आतापर्यंत ३५० पानांचे संकलन करून पूर्ण झाले आहे.

दोन हजार लेखांची मेजवानी
या संकलन उपक्रमाची नोंद हाय रेंज बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून याचे प्रमाणपत्र सोनवणे यांना १० मार्च रोजी सावित्रीबार्इंची कर्मभूमी असलेल्या पुण्यातील एका कार्यक्रमात दिले जाणार आहे.

ई - बुकमध्ये सुमारे २००० हजार लेखांचा समावेश करणार असून त्याचे काम सुरू आहे. या ईबुकचा ११ एप्रिल २०१९ रोजी अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रकाशन करण्याचा मानस सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Various tributes to Savitribai by e-book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.