वसई महापालिकेची परिवहनसेवा खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:39 PM2018-11-25T23:39:41+5:302018-11-25T23:39:49+5:30

दररोज १० ते १२ बसमध्ये बिघाड : २६ चालकांवर निलंबनाची कारवाई

Vasai municipal transport service is on trouble | वसई महापालिकेची परिवहनसेवा खिळखिळी

वसई महापालिकेची परिवहनसेवा खिळखिळी

Next

वसई : महानगरपालिकेची परिवहन सेवा खिळखिळी झाली असून दररोज तिच्या १० ते १२ बस बंद पडत आहेत.
भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत ही सेवा चालविण्यात येते. तिच्या दररोज १० ते १२ बसेस नादुरुस्त होत असल्याचे खुद्द परिवहन विभागाच्या व्यवस्थापकांकडूनच सांगण्यात आले. अनेक चालक भरधाव बस चालवत असून परिवहन विभागाने २६ बसचालकांना निलंबित केले आहे तर ३८ जणांना कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे.


या बस धूर ओकणाऱ्या आणि खिळखिळ्या झाल्या असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. चालक बसेस भरधाव आणि बेदरकारपणे चालवत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.


गेल्या सहा वर्षांत परिवहनच्या बसेसना ४४ मोठे अपघात झाले असून त्यात १८ जणांचे बळी गेले, तर २६ जण जखमी झाले. या सेवेत एकूण १४९ बस असून त्यामध्ये ३० महापलिकेच्या तर ११९ भागीरथी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आहेत. दररोज १३८ बस रस्त्यावर धावतात, त्यांच्या एकूण ८०० फेºया होतात. मात्र अनेक बस रस्त्यात बंद पडतात, अशी तक्र ार प्रवाशांनी केली आहे.


या बस धूर ओकणाºया आणि योग्य दर्जाच्या नसल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. बहुतांश बसचे इंजिन बंद पडत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.


बसेसप्रमाणे त्यांचे चालक आणि वाहक हेदेखील सौजन्यशील नाहीत, उद्धटपणे वागणे, बोलणे, प्रवाशांचा पाणउतारा करणे, सुट्टे पैसे न देणे, चिल्लर जवळ न ठेवणे असे प्रकार सतत घडत असतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

प्रवाशांकडून रोजच तक्रारी
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाच्यावतीने व्हॉट्सअप हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. या क्रमांकावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. २० दिवसांत ३२ तक्र ारी व सूचना आल्या आहेत. बस वेळेवर न पोहोचणे, चालकांचे उर्मट वर्तन, भरधाव गाडी चालवणे, बसमधील आसने नीट नसणे, थांब्याच्या पुढे बस थांबवणे अशा अनेक प्रकारच्या तक्र ारी प्रवाशांनी केल्या आहेत.
या तक्र ारींचे निवारण नित्य करण्यात येत असते.

Web Title: Vasai municipal transport service is on trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.