वसई-विरार महापालिका ‘नापास’
By admin | Published: May 6, 2017 05:13 AM2017-05-06T05:13:06+5:302017-05-06T05:13:06+5:30
आरोग्यावर दरसाल सव्वाशे कोटी रु पे खर्चूनही स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई-विरार महापालिका नापास झालचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे
संजू पवार/ लोकमत न्यूज नेटवर्क
आरोग्यावर दरसाल सव्वाशे कोटी रु पे खर्चूनही स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई-विरार महापालिका नापास झालचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोग्यावर केलेला खर्च नेमका जातो कुठे असा प्रश्न आता विचारला जात आहे.
वसई, नवघर-माणकिपुर, नालासोपारा आणि विरार नगरपालिका विलीन करून ३ जुलै २००९ साली वसई-विरार महानगरपालिका अस्तित्वात आली. ग्रामीण भागातून विरोध झाल्यानंतरही सलग दुसऱ्यांदा पालिकेवर बहुजन विकास आघाडीने सत्ता काबीज केली. दुसऱ्या टर्ममध्ये तर आघाडीने १०५ जागा जिंकून विक्र म केला. त्यामुळे लोकांच आघाडीकडून अपेक्षा वाढल्याचे दिसून आले. आयुक्त सतिश लोखंडे यांनीही आपला दरारा दाखवताना अनिधकृत बांधकामावर हतोडा मारण्याचा सपाटा लावला. त्यामुळे भूमाफियांमध्ये त्यांची दहशत निर्माण झाली होती. मात्र, डासांच वाढत साम्राज्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याची तक्र ारी वाढत चालले आहेत. सद्याच ९ प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे १३ लाख लोकसंख्याची समिकरण बसवतांना पालिका प्रशासनाला म्हणावे तसे यश आलेले नाही.
नुकतीच हाती लागल्या आरोग्य विभागावरील खर्चाच्या आकडेवारी नुसार अपेक्षित परिणाम न दिसून आल्याने यावर झालेल्या कोट्यवधीचा खर्च कुणाच्या खिशात गेला याविषय चर्चा रंगत आहे.
भ्रष्टाचारामुळे झाली पिछेहाट?
लोकसंखेच आरोग्यासाठी दरसाल सव्वाशे कोटी रु पयस महापालिकेकडून खर्च केले जात आहे.मात्र,हा खर्च केवळ दिखाऊ असल्याच स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या सर्व्हेत उघडकिस आले आहे.
या सर्व्हेमध्ये सव्वाशे कोटी आरोग्यावर खर्च करणाऱ्या वसई-विरार महापालिकेने सव्वाशेवा क्र मांकही पटकावलेला नाही.
ही महापालिका चक्क १३९ व्या क्र मांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे आरोग्यावरील खर्च भ्रष्ट्राचाराच्या चिखलात रु तला की, काय अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.