ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासींकडून वसुबारस साजरी
By सुरेश लोखंडे | Published: November 9, 2023 06:15 PM2023-11-09T18:15:23+5:302023-11-09T18:16:28+5:30
आदिवासींचे प्रतिक म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारफाधारी आदिवासी व्यक्तीचा पुतळा उभारलेला आहे.
ठाणे - जिल्हा हा आदिवासी, दुर्गमभागाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असे. मात्र आता या जिल्ह्याचे विभाजन हाेउन पालघर हा १०० टक्के आदिवासी जिल्हा निमार्ण झालेला आहे. पण आदिवासींचे प्रतिक म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारफाधारी आदिवासी व्यक्तीचा पुतळा उभारलेला आहे.
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, या आजच्या या दिवसी दरवर्षा प्रमाणे आदिवासींनी या पुतळ्या समाेर तारफा वाद्याच्या तालासुरात नृत्य करून ठाणेकरांचे मन जिंकत आज वसुबारस साजरी केली. यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध संघटनांमधील व्यक्ती व महिलांनी सहभाग घेउन तारफाच्या तालासुरात या प्रांगणावर नृत्य साधर करून वसुबारस साजरी केली.