वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्पियनशीपसाठी वेद दुसाची निवड
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 12, 2022 03:36 PM2022-09-12T15:36:50+5:302022-09-12T15:37:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्पियनशीपसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. फिना वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात निवड होणारा वेद हा ठाण्यातील आतापर्यंतचा एकमेव जलतरणपटू आहे.
वेद दुसा हा ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे रुपेश घाग यांच्या मार्गदर्शखाली घेत आहे. तो दररोज संध्याकाळी ९ ते ११ सराव करीत असतो. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या रावासाठी मालवण, पुणे येथे देखील तो स्पर्धेत उतरला होता. याआधी त्याने १६ किमी गोव्यात तर १० किमी पुण्यात स्वीमिंग केले आहे. त्याचा सराव पूर्ण झाला असून आज रात्री फिना वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी रवाना होत आहे. वेद दुसा याची निवड झाल्याबद्दल प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी त्यांचे कौतुक केले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर स्पर्धा ही १५ ते १८ सप्टेंबर या कालावधी सियचल्स देशात होणार असून या स्पर्धेसाठी वेद रवाना होण्यापूर्वी त्याची निवड झाल्याबद्दल नुकतेच केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील तसेच कोकण पदवीधर मंचचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी दिल्या.
भारतीय जलतरण संघटनेचे महाराष्ट्राचे कन्व्हेनर राजेंद्र पालकर, महाराष्ट्र जलतरण संघटनेचे सदस्य राजेश मोरे यांनी महाराष्ट्राच्या जलतरणपटू भारतीय संघात निवड झाल्याबादल वेदचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, कै. मारोतराव शिंदे तरणतलावाच्या व्यवस्थापक रिमा देवरुखकर कळवा येथील तरणतलावाचे व्यवस्थापक रवि काळे यांनी देखील त्याचे कौतुक करुन त्याला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.