वेदांत रुग्णालयाला त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करुन पाच दिवसात अहवाल करावा लागणार सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 03:30 PM2021-04-29T15:30:36+5:302021-04-29T15:32:44+5:30
महापालिकेने दिले रुग्णालयाला आदेश
ठाणे : येथील वर्तक नगर भागात असलेल्या वेंदात हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन अभावी चार जणांचा मृत्यी झाला नसल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून आता स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे ठाणे महापालिकेने आता या रुग्णालयाला होत असलेला प्राणवायुचा पुरवठा, अतिदक्षता विभागातील रुग्ण आणि प्राणवायु पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा यांची नियमीतपणो त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी. यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करुन त्याबाबतचा अहवाल महापालिका आरोग्य विभागाला पुढील सात दिवसात सादर करावा असे आदेश दिले आहेत.
उच्चस्तरिय चौकशी समितीने दिलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे ठाणे महापालिका प्रशासनाने वेदांत रुग्णालयाला महत्वाच्या सूचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची स्थिती रुग्णांच्या नातेवाईकांना नियमीतपणे देण्यासाठी प्रशिक्षीत व्यक्तींची नियुक्ती करावी, अशा व्यक्तीच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलद्वारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचेशी संवाद घडवून आणावा. ही कार्यवाही विनाविलंब तात्काळ करण्यात यावी. रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती व रुग्णाची आरोग्य स्थिती वेळोवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना कळविण्याची यंत्रणा निर्माण करावी, जेणोकरून रुग्णालय व्यवस्थापन व रुग्णांचे नातेवाईक यांचेमध्ये गैरसमज होणार नाही. रुग्णालयाला होत असलेला प्राणवायुचा पुरवठा, अतिदक्षता विभागातील रु ग्ण आणि प्राणवायु पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा यांची नियमीतपणो त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी.
यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करुन त्याबाबतचा अहवाल महापालिका आरोग्य विभागाला सादर करावा. ही कार्यवाही ५ दिवसाच्या आत पूर्ण करावी. रुग्णालयाचे अग्निशमन सुरक्षा, विद्युत आणि प्राणवायू पुरवठा प्रणालीचे परिक्षण सक्षम प्राधिकायांकडून तात्काळ करण्यात यावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आरोग्य विभागाला तात्काळ सादर करावा. ही कार्यवाही ७ दिवसांच्या आत पूर्ण करावी, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.