स्वातंत्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात, ५० बचत गटांच्या सहभागातून रानभाज्या महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 04:24 PM2021-08-15T16:24:34+5:302021-08-15T16:26:57+5:30

ठाणे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रान भाज्या प्रदर्शन व पदार्थ विक्री ...

Vegetable Festival with the participation of 50 self help groups at the Collectorate premises on Independence Day | स्वातंत्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात, ५० बचत गटांच्या सहभागातून रानभाज्या महोत्सव

स्वातंत्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात, ५० बचत गटांच्या सहभागातून रानभाज्या महोत्सव

Next

ठाणे: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाज्या प्रदर्शन व पदार्थ विक्री महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.या महोत्सवात जिल्ह्यातील तब्बल ५० बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेऊन रानभाज्यांपासून तयार केलेल्या रुचकर, खरपूस पदार्थांची आगळीवेगळी मसालेदार चव ठाणेकरांनी रविवारी चाखली.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन व पदार्थ विक्री या महोत्सवात करण्यात आली. पाऊस असतानाही ठाणेकर खवय्यांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली. आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे, त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे, या करता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी ही संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासनाचे कृषि विभागाचे धोरण आहे. त्यास अनुसरून आज या रानभाज्या महोत्सवास ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.

या  महोत्सवांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या फळभाज्या, पावसाळ्याच्या सुरवातीला येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याचे दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवाना उत्पनाचे स्रोत निर्माण करणे, या करिता रानभाज्या प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनास स्थानिक नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी या रानभाज्याची पाक कला स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे ५० महिला व बचत गटांनी सहभाग घेवून विविध प्रकारच्या रानभाज्याची चव चाखण्याची संधी सर्व सामान्यांना उपलब्ध करून दिली. यावेळी  जिल्हा परिषद, कृषी विभाग व इतर  विविध विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचा महोत्सवांमध्ये उत्कृष्ठ काम केल्या बद्दल सन्मान करण्यात आला. रानभाज्या महोत्सव  ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्वोरमेंटल सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
 

Web Title: Vegetable Festival with the participation of 50 self help groups at the Collectorate premises on Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.