भाजी मंडईचे आता शहरातील चार भागात विभाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:04 PM2020-04-09T16:04:52+5:302020-04-09T16:06:18+5:30

ठाण्यातील जांभळी नाका येथील मंडईचे दोन वेळा स्थलांतर करुनही या मंडईतील गर्दी कमी होत नसल्याने अखेर महापालिकेने शहरातील चार विभागात या भाजी मंडईची विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी शुक्रवार पासून केली जाणार आहे.

Vegetable market is now divided into four parts of the city | भाजी मंडईचे आता शहरातील चार भागात विभाजन

भाजी मंडईचे आता शहरातील चार भागात विभाजन

Next

ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने जांभळी नाक्यावरील मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केली होती. मात्र येथेही सोशल डिस्टेन्टसचा नियम पाळला जात नसल्याने अखेर ही मंडई जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर भरविण्यास सुरवात झाली आहे. परंतु या ठिकाणी देखील नागरीकांकडून सोशल डिस्टेसींगचे जराही पालन होतांना दिसत नसल्याचे चित्र असल्याने आता पालिकेने ही मंडई शहरातील चार भागात विभागणी करुन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
                    जांभळी नाका ते स्टेशन पर्यंत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईत गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देण्यासारखीच होती. त्यामुळे येथील ४०० भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे स्थलांतर पालिकेने बुधवार पासून सेंट्रल मैदानात केले होते. परंतु, बुधवारी काही प्रमाणात तेथे गर्दी दिसून आली. मात्र गुरुवारी या ठिकाणी नागरीकांनी सोशल डिस्टेन्टसचा कोणताही नियम पाळला नसल्याचेच दिसून आले. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी आवाहन करुनही नागरीक याला हरताळ फासतांनाच दिसत होते. त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न पालिकेला पडला होता. त्यानुसार गुरुवारी पुन्हा या संदर्भात बैठक घेऊन यावर दुसरा पर्याय पालिकेने पुढे आणला आहे. त्यानुसार जांभळी नाका भागातील तीन रस्ते आता यासाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता येथील सुभाष पथ, शिवाजी पथ आणि चितांमणी चौकातील रस्ते यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याठिकाणी देखील नागरीकांकडून गर्दी केली जात होती. तसेच सोशल डिस्टेसींगच्या नियमालाही हरताळ फासला जात होता. त्यामुळे गुरुवारी या संदर्भात पालिकेचे अधिकारी आणि भाजी मंडईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन शहरातील चार विभागात या मंडईचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येथे असलेल्या २५० भाजी विक्रेते आणि फळविक्रेत्यांचे आता ठाण्यातील घोडबंदर भागातील बोरीवडे, कळव्यातील पारसिक नगर, ढोकाळी येथील हॉयलन्ड आणि रेमंड कंपनी येथील रस्त्यावर या मंडया सुरु करण्यात येणार आहेत. तशा सुचनाही देण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. तर, शुक्रवार पासूनच या मंडई हलविण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
 

Web Title: Vegetable market is now divided into four parts of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.