आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले
By admin | Published: July 9, 2015 11:56 PM2015-07-09T23:56:50+5:302015-07-09T23:56:50+5:30
पंधरा दिवसांपूर्वी वधारलेले भाज्यांचे भाव आता आवक वाढल्याने प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने भाज्यांची आवक बाजारात वाढल्याचे
ठाणे : पंधरा दिवसांपूर्वी वधारलेले भाज्यांचे भाव आता आवक वाढल्याने प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने भाज्यांची आवक बाजारात वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पाऊस जास्त झाला तर भाज्या शेतातच खराब होतात आणि त्यांची आवक मंदावते. गेल्या महिन्यात झालेला भरपूर पाऊस तसेच घाटात कोसळलेल्या दरडी यामुळे भाजीचे ट्रक रस्त्यात अडकल्याने आवक मंदावली होती व भाज्यांचे भाव वधारले होते.
आता पाऊस थांबल्याने आवक वाढली असून १५ दिवसांपूर्वी ८० रुपये किलोने मिळणारा फ्लॉवर ६० रुपयांनी मिळतो. तर ६० रुपये किलोने मिळणारी सिमला मिरची आता ४५ रुपये झाली आहे. प्रत्येक भाजीचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी कमी झालेत.