कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली

By अनिकेत घमंडी | Published: December 5, 2017 05:57 PM2017-12-05T17:57:44+5:302017-12-05T18:07:20+5:30

सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आल्याने शेतमालाला मोठा फटका बसला.

Vegetable prices in Kalyan taluka remained steady, but due to bad weather, demand dropped by 500 quintals | कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली

भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली

Next
ठळक मुद्दे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला फटका महिनाभरात दुस-यांदा शेतमालाला फटकाऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आला

डोंबिवली: सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आल्याने शेतमालाला मोठा फटका बसला. वातावरणातील बदलामुळे महिनाभरात लागोलग दुस-यांदा फटका बसल्याने शेतक-यासमोर नेमके कोणते आणि किती पिक घ्यावे हा मोठा पेच निर्माण झाला असून शेतमाल खरेदी करणारे व्यापारीदेखिल हवालदील झाले आहेत.
मंगळवारी समितीत १८३९ क्वींटल सर्व भाज्या, पालेभाज्या २९ क्विंटल, कांदे-बटाटे २५४०, फळे १७२ क्विंटल, फुले २३५ क्विंटल असा एकूण माल आला. भाज्यांसह फळभाज्यांची आवक घटली, ती ऐरव्ही २२०० ते २५०० क्विंटल असते. पावसाचा जोर आणि वातावरण असेच राहीले तर मात्र मागणीवर असाच परिणाम राहणार असून पुढील दोन दिवस तरी भाजीपाल्याची आवक तुलेनेने कमी असेल असेही सांगण्यात आले. मार्गशिर्ष महिन्यात गुरुवारी महिलांच्या विविध व्रत वैकल्यांमुळेही त्या दिवशी भाजीची मागणी घटते, त्या तुलनेत फळांच्या मागणीत फारशी वाढ होत नाही हे दिसून आले. एकंदरितच या पावसाचा फटका शेतक-यांना बसणार असून शेतक-यांसह कृषी उत्पन्न समितीसमोर मोठा पेच उभा राहतो. सातत्याने होत असलेले बदल यामुळे सर्वसामान्यांसह होलसेल विक्रेत्यांच्या मानसीकेतवर नकारात्मक परिणाम होत असल्याचाही फटका खरेदी- विक्रीवर होत असल्याचे ते म्हणाले.
समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनूसार सोमवार रात्री पावसाला सुरुवात झाली. त्याआधी शनिवार-रविवार होता. त्यामुळे या दोन दिवसांत भाज्यांना मागणी नव्हती, त्यात सोमवारी रात्रभर पावसाचा कमी अधिक जोर, पहाटेच्या वेळेत धुके यामुळे भाजीपाला येण्यास अडथळे आले. तसेच मागणीही कमी आली, त्याचा फटका बाजारावर झाला. गेले आठवडाभर भाज्यांचे भाव स्थिर होते, त्यामुळे होलसेल विक्रेत्यासह सामान्य ग्राहकाला दिलासा मिळाल होता. सोमवारच्या अचानक आलेल्या पावसामुळे गारठा वाढला, आणि आवक घटली.

Web Title: Vegetable prices in Kalyan taluka remained steady, but due to bad weather, demand dropped by 500 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.