भाज्यांचे दर पुन्हा कडाडले, १० हजार क्विंटलवरुन थेट ५७४५ क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:24 AM2017-11-23T03:24:38+5:302017-11-23T03:24:58+5:30

डोंबिवली : आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे गृहिणींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Vegetable prices reverted, from 57 thousand quintals directly to 5745 quintals | भाज्यांचे दर पुन्हा कडाडले, १० हजार क्विंटलवरुन थेट ५७४५ क्विंटल

भाज्यांचे दर पुन्हा कडाडले, १० हजार क्विंटलवरुन थेट ५७४५ क्विंटल

Next

अनिकेत घमंडी 
डोंबिवली : आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे गृहिणींमध्ये चिंता व्यक्त होत आहे. महिनाभरात सलग तीन ते चार वेळा भाज्यांचे भाव कडाडल्याने आता खायचे तरी काय, असा सवाल विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून खरीपाच्या पिकांचा शेवट होत आहे. त्यात अवकाळी पावसाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठवडाभर गारवा वाढत गेला. गेल्या तीन दिवसांपासून अचानक उष्मा वाढला. त्याचा परिणाम भाज्यांवर झाला. आवक घटली आणि दर वाढले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत एरव्ही दहा हजार क्विंटल भाजीपाला येतो. मात्र चार-पाच दिवसांपासून त्यात ४० टक्के घट झाली असून सध्या ५७४५ क्विंटल भाजीपाला येत आहे. त्यामुळेही भाजीपाल्याचे दर कडाडल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे म्हणाले, अपेक्षित नसतानाही रविवार, सोमवारमध्ये पावसाने अचानक हजेरी लावली. त्याआधी महिनाभरापूर्वीच पावसाने शेतपिकाचे नुकसान केले. उभ्या पिकातल्या भाज्यांचा मोहोर गळाला, त्यामुळे हाताशी आलेले पिक गेले. त्यामुळे भाज्यांचे पिक घेणारा शेतकरी दोन महिन्यात हवालदिल झाला आहे. बाजारात घाऊक आणि किरकोळ मालाला मागणी असली, तरी पिक नसल्याने करायचे तरी काय असा सवाल शेतकºयांसमोर आणि भाजी विके्रत्यांसमोर आहे.
शहरी भागात रेल्वे स्थानक परिसरात सर्वत्र फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे. त्यात भाजीविके्रत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आधीच भाजी मिळत नसल्याने आबालवृद्ध हैराण झालेले असतांनाच आता भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने दुहेरी कोंडी झाली आहे. टोमॅटो ८० ते १०० रुपये किलोंच्या घरात गेला आहे. कडधान्य विकत मिळतात, पण ती तरी किती खायची? २५ रुपये पाव किलो अशा दराने ती मिळतात. कोथिंबिरीची जुडी पाच रुपयाला मिळत होती. आता ती देखील रातोरात कडाडली. अळूची पाने २० रुपयांना सहा ते आठ मिळतात. तो मालही माल कमी असल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे.
>पालेभाज्याही महागल्या
या घाऊक भाजीबाजारातून बदलापूर, वसई, टिटवाळा, डोंबिवली परिसरात सर्वत्र भाजीपाला जातो. जेवढा दळणवळणाचा खर्च जास्त तेवढा भाज्यांचा किलोमागे दर जास्त हे समीकरण असल्याने भाज्यांचे दर अपेक्षेपेक्षा वाढलेले आहेत.
प्रत्येक भाजी किरकोळ बाजारात किलोमागे ठिकठिकाणी २० ते २५ रुपये जास्त चढ्या भावानेच विकली जात आहे. त्यामुळे ही तफावत मोठी होत गेली आहे. पालेभाज्याही कडाडल्या आहे.
मेथी- ४० रूपये, पालक-१५, मुळा-३५, शेपू- १५ ते २०, कोथिंबिर - २० रुपये, कांदा पात २५ रुपये, कढीपत्ता ३० रुपये हा होलसेलचा भाव आहे.. पण प्रत्यक्षात त्या मूळ किंमतीतही १० ते १५ रुपये जास्त आकारले जातात.
>भाज्यांचे घाऊक दर
कल्याण कृषी उत्पन्ना बाजार समितीतील भाज्यांच्या होलसेलच्या दरानुसार, (प्रतिकिलो) भेंडी ३६ रुपये, दुधी भोपळा १५रुपये, लाल भोपळा १५ रुपये, फ्लॉवर २० रुपये, कोबी २० रुपये, गवार ४० रुपये, घेवडा ४० रुपये, वांगी ३५ रुपये, वाटाणा ६० रुपये, शिराळी ३५ रुपये, कारली ३५ रुपये, तोंडली २५ रुपये, टोमॅटो ६०रुपये, सुरण २५ रुपये, शेवगा ६० रुपये, काकडी १५ रुपये असा दर आहे.
>थंडी वाढायला हवी
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही भाजी बाजारासाठी मुख्य बाजारपेठ आहे. नवी मुंबईत एपीएमसी मार्केट असल्याने तेथे पुणे, पनवेल, अलिबाग आदी भागातून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. तर कल्याण, डोंबिवलीला नासिक, शहापूर आदी भागातील शेतमालावर अवलंबून रहावे लागते. कल्याणच्या बाजारात भाजीचा मालामध्ये कमालीची घट झाली आहे. उष्णता कमी होऊन थंडीने जोर धरायला हवा; अन्यथा पंधरवडा असाच महागाईचा जाणार असल्याचा अंदाज आहे.

Web Title: Vegetable prices reverted, from 57 thousand quintals directly to 5745 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.