ठाण्यात २० टक्क्यांनी वाढले भाज्यांचे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:18 AM2018-10-11T00:18:05+5:302018-10-11T00:18:18+5:30
गेल्या तीन दिवसांपासून ठाण्यातील भाज्यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.
ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून ठाण्यातील भाज्यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.
ठाण्याच्या बाजारपेठेत पूणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद यासारख्या ठिकाणांसह दक्षिण भारतातून भाजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून ३० ते ४० टक्क्यांनी भाज्यांची आवक घटली आहे.
भाज्यांची नावे दर
फ्लॉवर ५० ते ६०
कोबी २० ते २४
गवार ६० ते ८०
भेंडी ५० ते ६०
काकडी ३० ते ४०
टोमॅटो २० ते २४
गाजर ३० ते ४०
सिमला मिरची ५० ते ६०
दुधी भोपळा ३० ते ४०
शेवग्याच्या शेंगा (गावठी) १०० ते१२०
शेवग्याच्या शेंगा (मद्रास) ६० ते ८०
कोथिंबीर ३० ते ५०
हिरवी मिरची (तिखट) ३० ते ४०
हिरवी मिरची ६० ते ८०
शिराळे ४० ते ५०
मटार १५० ते१६०
गेल्या तीन दिवसांपासून भाज्यांचा तुटवडा आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे
भाज्यांच्या आवकवर परिणाम झाला आहे.
- भगवान तुपे, भाजी विक्रेते