ठाण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने जप्त केली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:45 PM2020-04-01T19:45:31+5:302020-04-01T20:03:01+5:30

अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने यापुढे जप्त केली जाणार असल्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, ठाण्यातील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकानेही १ ते १४ एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Vehicles arriving on the roads will be confiscated except essential services at the Thane | ठाण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने जप्त केली जाणार

र्व प्रकारच्या मद्य विक्रीलाही १४ एप्रिलपर्यंत बंदी

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी लागू केला मनाई आदेशसर्व प्रकारच्या मद्य विक्रीलाही १४ एप्रिलपर्यंत बंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहरातील वाहतूकीला यापुढे मनाई आदेशाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने यापुढे जप्त केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, ठाण्यातील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकानेही १ ते १४ एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
आधी लागू केलेला आदेश ३१ मार्च रोजी संपल्यानंतर पुन्हा नव्याने पोलीस आयुक्तांनी १ ते १४ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. यातून रेशनिंग दुकाने, किराणा माल, दूध, फळे, डेअरी, बेकरी, मांस आणि मासे वाहतूक तसेच यासंबंधी प्रक्रीया उद्योगाला लागणारा कच्चा माल वाहतूक, वीज निर्मिती, प्रिंट आणि इलेक्ट्रानिक प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, वैद्यकीय, बँक कर्मचारी तसेच जल, हवाई वाहतूक करणारे कर्मचारी आदींसाठी लागू राहणार नाही. विलगीकरण सुविधेसाठी वापरल्या जाणाऱ्या आस्थापना, सुरक्षारक्षक आणि धार्मिक स्थळांची पूजा देखभाल करणाऱ्यांनाही यातून वगळले आहे. मात्र, याव्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर विनाकारण आल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सायकलसह दुचाकी, जड अथवा कोणतेही वाहन रस्त्यावर आढळल्यास पोलिसांकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, ठाणे जिल्हयातील बियर शॉप, परमिट रुम, देशी आणि विदेशी अशा सर्व प्रकारची मद्य विक्री करणाºया दुकानेही १ ते १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत. या काळात कोणीही दुकाने सुरु ठेवली तर त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Vehicles arriving on the roads will be confiscated except essential services at the Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.