महाशिवरात्रीला ठाण्यातील बाजारपेठेत वाहनांना प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 03:12 PM2022-02-25T15:12:35+5:302022-02-25T15:12:53+5:30

वाहतूक पोलिसांची अधिसूचना, पहाटे ४ ते रात्री ११ वाजेर्पयत नो एन्ट्री

Vehicles banned from entering Thane market on Mahashivaratri | महाशिवरात्रीला ठाण्यातील बाजारपेठेत वाहनांना प्रवेश बंदी

महाशिवरात्रीला ठाण्यातील बाजारपेठेत वाहनांना प्रवेश बंदी

Next

ठाणे: येत्या १ मार्च रोजी महाशिवरात्री असल्याने ठाण्यातील जांभळी नाक्यापासून सुभाषपथ मार्गे मुख्य बाजारपेठेतील ए वन फर्निचरकडे जाणारा रस्ता सर्वच वाहनांसाठी पहाटे ४ ते रात्री वाजेपर्यंत बंद केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेतील कौपिनेश्वर मंदिर याठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. याठिकाणी मोठया प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या परिसरातील नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी जांभळी नाका ते ए वन फर्निचरकडे जाणा:या मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना जांभळी नाका येथे प्रवेश बंद राहणार आहे. त्या मार्गाऐवजी ही वाहने जांभळी नाका येथून उजवीकडे वळण घेऊन टॉवरनाकामार्गे जातील, असे वाहतूक नियंत्रण शाखेने काढलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. ही अधिसूचना पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू राहणार नसल्याचेही वाहतूक नियंत्रण शाखेने म्हटले आहे.

Web Title: Vehicles banned from entering Thane market on Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे