वाहने भंगारमध्ये काढली; वाहनांअभावी कामे अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 11:35 AM2023-05-27T11:35:43+5:302023-05-27T11:35:50+5:30

सुरेश लाेखंडे । लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शासकीय कार्यालयातील मुदत संपलेली वाहने १ मे पासून भंगारमध्ये काढण्याची सूचना ...

Vehicles scrapped; Work was stopped due to lack of vehicles in thane | वाहने भंगारमध्ये काढली; वाहनांअभावी कामे अडली

वाहने भंगारमध्ये काढली; वाहनांअभावी कामे अडली

googlenewsNext

सुरेश लाेखंडे । लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शासकीय कार्यालयातील मुदत संपलेली वाहने १ मे पासून भंगारमध्ये काढण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांची वाहने भंगारमध्ये काढण्यात आली. मात्र काही विभागांना नवी वाहने न मिळाल्यामुळे त्यांची कामे खाेळंबली आहेत. त्यात पावसाळा डाेक्यावर आलेला असताना कामे हातावेगळी करताना शासकीय विभागांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र ग्रामीण व दुर्गम भागात आहे. त्यामुळे वाहनांखेरीज काम करणे अधिकाऱ्यांना अशक्य आहे.

कुठली वाहने भंगारमध्ये? 
जुन्या वाहनांचे निर्लेखन करण्यास आयुक्त अथवा शासन स्तरावर मंजुरी मिळते. वाहनांची लिलावात विक्री करता येते. विक्री न झाल्यास. या मुदत संपलेल्या सर्व वाहनांना भंगारात काढण्यात येते.

महिनाभरात सहा शासकीय वाहने भंगारमध्ये 
    जिल्हा परिषदेने मागील वर्षी चार वाहनांची विक्री केली. मात्र दोन वाहनांना कोणीही बोली लावली नाही. आतापर्यंत ठाणे जिल्हा परिषदेने चार मोटार, दाेन टेम्पो आणि एक जीएसडीएचेचे विंधन यंत्र ही वाहने भंगारात काढली.
    शासकीय कायार्लयांच्या या वाहनांना भंगारात काढण्याचे आदेश असल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेने त्यांच्या सहा वाहनांना भंगारात काढले आहे. त्यामुळे त्यापासून संभाव्य नुकसान टळणार आहे.

वाहने कमी झाल्याने कामे अडली 
    जिल्हा परिषदेची वाहने  चार मोटारी 
    हातपंप देखभाल -  दाेन हातपंप दुरुस्ती टेम्पो
    जीएसडीएचे - एक विंधन यंत्र भंगारात काढली आहेत.

वापरण्यास अयाेग्य असलेल्या वाहनांना शासन मान्यतेनुसार निर्लेखित करण्यात येते. यानुसार जिल्हा परिषदेचे दाेन जीप निर्लेखित केले आहेत. यातील जि.प.च्या दाेन जीप जि.प. आवारात आहेत.  एक कार्यशाळेत आणि चार वाहने जीएसडीएच्या भिवंडी येथील कार्यशाळेत जमा आहेत.
    - संजय सुट्टे, 
    अभियंता, जि.प., ठाणे
 

Web Title: Vehicles scrapped; Work was stopped due to lack of vehicles in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.