नौपाडा पोलीस ठाण्याच्या मैदानावर विषारी घोणस साप; पोलिसांमध्ये घबराट!

By सुरेश लोखंडे | Published: December 18, 2022 09:49 PM2022-12-18T21:49:53+5:302022-12-18T21:53:19+5:30

ठाणे अंमलदार पोहवा पवार यांनी तत्काळ सर्पमित्र पोलीस हवलदार ज्ञानेश्वर शिरसाठ यांना पाचारण केले आणि त्यास तत्काळ पकडून जंगलात सोडले.

Venomous snake on Naupada police station grounds Panic in the police | नौपाडा पोलीस ठाण्याच्या मैदानावर विषारी घोणस साप; पोलिसांमध्ये घबराट!

नौपाडा पोलीस ठाण्याच्या मैदानावर विषारी घोणस साप; पोलिसांमध्ये घबराट!

googlenewsNext

ठाणे : येथील नौपाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात आज पोलिस हवालदार सुनील पवार यांना साडेचार फुटाचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. घाबरलेल्या आवस्थेत त्यांनी तत्काळ सर्पमित्र पोलीस हवलदार ज्ञानेश्वर शिरसाठ यांना पाचारण केले आणि त्यास तत्काळ पकडून जंगलात सोडले.

शहरात चहूबाजूने नागरी वस्ती, इमारतींचे जंगल, सतत वर्दळीचा आणि गाड्यांची येजा असलेल्या या परिसरात घोणस जातीचा जीव घेणारा विषारी सापपोलिस ठाण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भला मोठा असलेल्या या सापामुळे पोलिसठाण्यातील पोलिस अधिकारी,कर्मचाºयाचा घात झाला असता. सुदैवाने पावर यांच्या निदर्शनात हा साप आला आणि त्यांनी तत्काळ शिरसाट यांना बोलवून घेत त्यास पकडले.

मात्र या सापाल तत्काळ पकडून जंगलातील आदिवासात सुखरूप सोडले आहे. या विषारी सापामुळे कर्तव्यार्थ दक्ष असलेल्या पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदारांच्या जीवावर बेतले असते. मात्र शिरसाठ यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधान दाखवत त्यास वेळीच पकडल्यामुळे पोलिसांनी निश्वास सोडला.
 

 

Web Title: Venomous snake on Naupada police station grounds Panic in the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.