कथाकथन स्पर्धेत संकेत वानेरे प्रथम
By admin | Published: July 6, 2017 06:15 AM2017-07-06T06:15:33+5:302017-07-06T06:15:33+5:30
शाळा, पाऊस, आई, बाबा, विद्यादान, सातबारा, नातं, प्रेम, विरह अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वरचित हलक्याफुलक्या, धीरगंभीर कविता आणि
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शाळा, पाऊस, आई, बाबा, विद्यादान, सातबारा, नातं, प्रेम, विरह अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वरचित हलक्याफुलक्या, धीरगंभीर कविता आणि कथाकथन सादर करुन ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन, काव्य सादरीकरण स्पर्धेत रंगत आणली. यात कथाकथन स्पर्धेत संकेत वानेरे याने तर काव्य स्पर्धेमध्ये संकेतसह भरत कदमनेही बाजी मारली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धा उत्साहात झाल्या. ठाण्यातील वसंत आणि शांत पटवर्धन ट्रस्टच्या विश्रांती सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेला उपस्थितांनी उत्तम दाद दिली. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, राजन खान, बाबा परीट या कथाकारांनी नुसत्या कथा लिहिल्या नाहीत तर कथांचे सादरीकरणही केले. त्यामुळे कथा लोकाभिमुख झाली आणि कथाकथन साहित्य प्रकार लोकिप्रय झाला असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थांनी या आणि इतर लेखकांच्या कथा सादर करून कथाकथन स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेला विद्यार्थांनी चांगली उपस्थिती दर्शवली. शहापूर, बोरिवली, ठाणे, कल्याण, मुंबई आदी भागातून विद्यार्थी सहभागी झाले होते. कथाकथन स्पर्धेत प्रथम क्र मांक संकेतने पटकावला तर द्वितीय क्र मांक जयश्री बाविस्कर, ऋ तुजा शिनगारे यांना विभागून देण्यात आला.
दिशा सरमळकर आणि भावेश साटम यांना तृतीय क्र मांक देण्यात आला. काव्य स्पर्धेमध्ये संकेत आणि भरत कदम यांना विभागून प्रथम क्र मांक, अप्साना शेख द्वितीय क्र मांक तर दिव्या सरमळकर आणि पायल आडे यांनी तृतीय पटकावला. स्पर्धेचे परीक्षण कल्पना गोरे आणि शलाका चोचे यांनी केले. संस्थेच्या कार्यकर्त्या उज्ज्वला रानडे यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले. तसेच, यावेळी
कथा सादरीकरणाचा नमुना म्हणून लेखक राजन खान यांची कथा सादर केली.