किल्ले दुर्गाडीवरील त्रिपुरोत्सवाचे प्रणेते, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मनोहर वैद्य यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 08:45 PM2017-09-27T20:45:48+5:302017-09-27T20:45:48+5:30

ऐतिहासिक किल्ले दुगार्डीच्या त्रिपुरोत्सव उत्सवाचे प्रणेते  मनोहर वैद्य यांचे पार्कीन्सन आजाराने बुधवारी कल्याण येथे निधन झाले. दुगार्डी किल्ल्यावर साजरी होणारी त्रिपुरी पोर्णिमा उत्सव नव्या पिढीला माहिती व्हावे यासाठी त्यांनी १९६० मध्ये किल्यावर त्रिपुरोत्सव सुरु केला होता.

Veteran leader of Tripuro, on the Fort Durgadi, Sangh's senior volunteer Manohar Vaidya passes away | किल्ले दुर्गाडीवरील त्रिपुरोत्सवाचे प्रणेते, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मनोहर वैद्य यांचे निधन

किल्ले दुर्गाडीवरील त्रिपुरोत्सवाचे प्रणेते, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मनोहर वैद्य यांचे निधन

googlenewsNext

डोंबिवली - ऐतिहासिक किल्ले दुगार्डीच्या त्रिपुरोत्सव उत्सवाचे प्रणेते  मनोहर वैद्य यांचे पार्कीन्सन आजाराने बुधवारी कल्याण येथे निधन झाले. दुगार्डी किल्ल्यावर साजरी होणारी त्रिपुरी पोर्णिमा उत्सव नव्या पिढीला माहिती व्हावे यासाठी त्यांनी १९६० मध्ये किल्यावर त्रिपुरोत्सव सुरु केला होता. बालपणापासून ते कल्याणमध्ये वास्तव्याला होते, मल्हार संकूल येथे त्यांचे निधन झाले. 

छत्रपती शिवरायांनी ज्या ठिकाणी आरमार स्थापन करून संपूर्ण जगाला हिंदवी स्वराज्य कसे असु शकते याची प्रचिती करून देण्याचा प्रयत्न केला. त्या खाडीच्या किना-यालगतच हा दुगार्डी किल्ला असल्याने त्याचे एक वेगळे महत्व आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापन झाली त्या निमित्ताने कल्याणच्या नगराध्यक्षा  सुशीला खोब्रागडे यांच्या नेतुत्वाखाली नागरिकांची एक मिरवणूक किल्ल्यावर येणार होती. म्हणून कल्याणच्या संघाच्या शाखेतील स्वयंसेवकांनी दुगार्डीवर ध्वजारोहण केले. तेव्हा देवळात काहीही नव्हते.तरुणांनीच एक दगड आणून शेंदूर फासून श्रद्धेने दुगार्देवी म्हणून स्थपना केली. त्यात मनोहर वैद्य, शरद घारपुरे , मामा साठे, रमेश फडके,सुरेश साठे, विवेक रानडे,रमेश भणगे, माधव केळकर, अशी अनेक मंडळी उपस्थित असल्याची आठवण संघ स्वयंसेवक प्रविण देशमुख यांनी सांगितली.

त्यानंतर ठरल्या प्रमाणे मिरवणूक आली नगराध्यक्षा सुशीलाबाई खोब्रागडेंनी देवीची पूजा केली व किल्ल्याकडे दुर्लक्ष न करण्याचे सर्वांना आवाहन केले. त्याच वेळी उपस्थित स्वयंसेवकांनी त्रिपुरी पोर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणावर करण्याचा निश्यच केला. 

१९६० साली पासून संघ स्वयंसेवकांनी ऐतिहासिक कल्याणच्या दुगार्डी किल्ल्यावर दिपोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली, त्यावेळेस वैद्य यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी अन्य तरुण स्वयंसेवकांच्या बरोबर स्वीकारली होती. गेली ५४ वर्ष ते ही जबाबदारी चोखपणे बजावत होते. या त्रिपुर उत्सवत किल्ल्याच्या पायथ्यापासून  वरपर्यंत पणत्या लावला जातात, तसेच किल्ला वरील बुरुज, पुढचा रस्ता, मागच्या पाय-या, दिवाळी संपली की संघाचे बाल स्वयंसेवक घरोघरी जावून तेल, पणत्या व वाती जमा करतात. सुमारे साडेतीन हजार पणत्या लावल्या जातात रा.स्व. संघाच्या शाखेतील मुले विविध संस्थातील कार्यकर्ते किल्ल्यावर विविध भागात लावलेल्या पणत्या सतत तेवत रहातीलयाची काळजी घेतात. दुगार्डी किल्ला हे हिंदूंच्या भावनेचे प्रतिक आहे.कल्याण शहराची वाढती लोकसख्या व भोगोलिक परिसीमा लक्षात घेता अघिकाअधिक प्रमाणात तरूणानी याकामी सहभागी व्हावे असे आवाहन ते नेहमी करत असत अशा अनेक आठवणी कल्याणमधील संघ स्वयंसेवकांनी सांगितल्या. वैद्य यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, एक कन्या, जावई, नातवंड असा परिवार असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्री मल्हार संकूल, मोहींदरसिंग शाळे समोरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. संघाच्या हिवाळी शिबिरांसह विविध संघ शिक्षा वर्गांमध्ये विद्युत विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शहरातील असंख्य सामाजिक मंडळांना बहुतांशी वेळा विनामूल्य तत्वावर त्यांनी ही सुविधा दिली होती. सेवाकार्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Veteran leader of Tripuro, on the Fort Durgadi, Sangh's senior volunteer Manohar Vaidya passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.