ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसलेंनी केलं मोदी-योगी यांचं कौतुक, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 07:15 IST2025-02-09T07:14:34+5:302025-02-09T07:15:23+5:30

चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे  धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले

Veteran singer Padma Vibhushan Asha Bhosle praised Narendra Modi-Yogi adityanath | ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसलेंनी केलं मोदी-योगी यांचं कौतुक, म्हणाल्या...

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसलेंनी केलं मोदी-योगी यांचं कौतुक, म्हणाल्या...

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे - राजकारणातील माझे आवडते व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मला ते फार आवडतात कारण ते पहाटे उठून योगा करून मग कामाला लागतात दुसऱ्या व्यक्तींवर टीका करत नाही विरुद्ध पक्षाने कितीही आरोप केले तरी ते त्यांना काही बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यामध्ये फार आदर असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर मला योगीराज फार आवडतात. त्यात मला माझी प्रतिमा दिसते. त्यांच्यात हिम्मत, ताकद आणि स्पष्ट बोलण्याची तयारी आहे अशा शब्दांत अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांनी मोदी आणि योगी यांचे कौतुक केले. 

त्यापुढे म्हणाल्या की, मोदी हे महोदय, कुमार असे शब्द ते वापरतात विरोधी पक्ष कितीही वाईट बोलले तरी मोदी त्यांच्या भाषणातून शब्दच वापरतात. मी खूप वेळा त्यांना भेटले आहे. मला बाळासाहेब ठाकरे देखील फार आवडतात हे सांगताना त्यांच्याशी दोस्ती कशी झाली हा प्रसंग त्यांनी उलगडला. ठाकरे यांच्याबरोबर शेवटपर्यंत माझी दोस्ती होती म्हणून मला ते फार आवडतात. त्यांची छबी तुम्हाला कोणामध्ये दिसते हे विचारल्यानंतर भोसले यांनी "तुम जियो हजारो साल, साल के हो पचास हजार" असे गाणे गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. शिंदे हे बाळासाहेब यांची छाप असलेले नेते आहेत. जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली तशी शिंदे यांनी परत एकट्याने शिवसेना घडवली आणि मला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी लोकांच्या बोलण्याला तोंड दिले त्यामुळे ते यशस्वी झाले आणि ते अजून यशस्वी होतील अशा शब्दांनी त्यांना आशीर्वाद देते.

चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे  धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुष्यातील राजकारण खूप भयंकर होते हे सांगताना त्या म्हणाल्या की, घरातल्या राजकारणापेक्षा इंडस्ट्री मधील राजकारण भयंकर होते परंतु त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही कारण मी खूप मेहनती होती, वेळ पाळणारी होती. माझा माईक हा माझा देव आहे असे मी ठरवले होते. माझ्या विरुद्ध पुष्कळ लोक उभे राहिले होते पण मी काम संपले की निघून जायची. आपण दुसऱ्याला बोलण्याची ऊर्जा देऊ नये असे मला वाटते. त्या म्हणाल्या की मला काम नसले तर मी जगू शकणार नाही जोपर्यंत मी गाते तोपर्यंत मी जिवंत आहे.

ठाण्यातील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आनंदोत्सव संगीत समारोह या कार्यक्रमात भोसले यांची मुलाखत अभिजीत खांडेकर यांनी घेतली. यावेळी त्यांनी हिंदी मराठी गाण्यांच्या ओळी देखील सादर केल्या.

Web Title: Veteran singer Padma Vibhushan Asha Bhosle praised Narendra Modi-Yogi adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.