ज्येष्ठ साहित्यिक भुवनेन्द सिंह बिष्ट यांचे निधन
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 15, 2022 11:29 AM2022-09-15T11:29:18+5:302022-09-15T11:30:17+5:30
मंगला हायस्कूल येथे भुवनेन्द सिंह बिष्ट हे अध्यापन करत होते. ते मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झाले.
ठाणे : ज्येष्ठ साहित्यिक भुवनेन्द सिंह बिष्ट यांचे आज पहाटे ५ वा. दीर्घ आजाराने निधन झाले ते ९५ वर्षांचे होते. त्यांची अंतिम यात्रा १२ वाजता राहत्या घरून निघणार आहे. जवाहर बाग स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहेत.
मंगला हायस्कूल येथे भुवनेन्द सिंह बिष्ट हे अध्यापन करत होते. ते मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झाले. त्यांना लिहिण्याची आणि वाचण्याची लहानपणापासून आवड होती. त्यांनी बरेचसे साहित्य लिहून ठेवले होते. निवृत्तीनंतर त्यांनी त्या पुस्तकांचे प्रकाशन केले. त्यांना कवितेची विशेष आवड होती.
निवृत्तीनंतर त्यांचे पाहिले पुस्तक साधना के स्वर हे प्रकाशित झाले त्यांनतर अनुक्रमे जीवन गंगा, जिंदगी के तेवर, दांडी काठी की छाव ही पुस्तके एकापाठोपाठ प्रकाशित झाली. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि तीन मुले असा परिवार आहे.