वसई-विरार परिसरातील लॉजेस वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: July 16, 2016 01:39 AM2016-07-16T01:39:30+5:302016-07-16T01:39:30+5:30
नालासोपाऱ्यात मॉडेलिंंगच्या नावाखाली लॉजमध्ये नेऊन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर लगेचच वालीव येथील
शशी करपे, वसई
नालासोपाऱ्यात मॉडेलिंंगच्या नावाखाली लॉजमध्ये नेऊन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर लगेचच वालीव येथील एका अल्पवयीन मुलीला वजे्रेश्वरीच्या लॉजमध्ये नेऊन तिथे तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत लॉजमालकाला अटक केली आहे. मात्र, या घटनांनंतर वसई-विरार परिसरातील विशेषत: वसईच्या किनारपट्टीवरील असंख्य बेकायदा लॉजेसमधील सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांची चर्चा सुरू झाली आहे.
नालासोपाऱ्यात राहणाऱ्या रिंकू यादवने मॉडेलिंंगच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीसह दोन मुलींचे लैंगिक शोषण करून ब्लॅकमेलिंंग केल्याची घटना उघडकीस आली होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासात रिंकू यादव मुलींना वसईच्या सागरी किनाऱ्यावर असलेल्या लॉजेसमध्ये नेऊन तिथे फोटोशूटच्या नावाखाली अश्लील फोटो काढायचा. त्यानंतर बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करीत असे. याप्रकरणी पोलिसांनी एका लॉजमालकाला अटक केली आहे.
त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात वालीव येथून एका १७ वर्षांच्या मुलीला वज्रेश्वरीतील लॉजमध्ये नेऊन तिथे चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात वालीव पोलिसांनी वज्रेश्वरी येथील लॉजमालकास अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या लॉजमालकाकडे कसलाच परवाना नसल्याचे उघड झाले आहे.
वसईत राहणाऱ्या १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तिच्या मित्रासह ४ जणांनी वज्रेश्वरी येथील एका लॉजमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ६ जुलै रोजी ही घटना घडली होती. आरोपीपैकी एक जण या तरुणीचा मित्र होता. ज्या लॉजमध्ये बलात्काराची घटना घडली, त्या लॉजमालकाला पोलिसांनी अटक केली आहे. लॉजमालकाने आपल्या घराच्या आवारात ८ खोल्या बनवल्या होत्या. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाने नव्हते. येणाऱ्या ग्राहकाची तो नोंदवही ठेवत नव्हता. एका अल्पवयीन मुलीला ४ जण घेऊन आले, तेव्हाही त्याने रोखले नाही. उलट त्यांना रात्रभरासाठी एक रूम उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.