भिवंडीत ‘कॉपर टी’ने घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 09:44 PM2019-02-05T21:44:14+5:302019-02-05T21:48:03+5:30

भिवंडी : प्रसूतीनंतर एक महिन्याने संतती नियमनासाठी गर्भाशयांत बसविण्यात आलेल्या कॉपर टी मुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील टेमघर ...

The victim of 'Copper T' was the victim of the bearded 'Copper T' | भिवंडीत ‘कॉपर टी’ने घेतला महिलेचा बळी

भिवंडीत ‘कॉपर टी’ने घेतला महिलेचा बळी

Next
ठळक मुद्देसंतती नियमनासाठी गर्भाशायांत लावली कॉपर टीप्रसुतीनंतर महिन्याने लावली चूकीची कॉपर टीरक्तस्त्राव व पोटात दुखल्याने महिलेचा मृत्यू

भिवंडी: प्रसूतीनंतर एक महिन्याने संतती नियमनासाठी गर्भाशयांत बसविण्यात आलेल्या कॉपर टी मुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील टेमघर येथे घडली असून या प्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सपना राजकुमार गौतम (२१)असे मृत्यू झालेल्या महिलेचे नांव असून ती भादवड येथे रहात होती. मागील महिन्यात स्व. इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत तीची प्रसुती झाली. दुसरे मुल लगेच नको म्हणून संतती नियमनासाठी तीने गर्भाशायांत कॉपर टी बसवून घेतली होती. ही कॉपर टी चूकीची बसविल्याने तीची प्रकृती ढासळली. तसेच अंगावरून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे तीच्यावर रूग्णालयांत उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून तीच्या पोटात दूखु लागल्याने काल सायंकाळी तीला स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत दाखल केले होते. मात्र उपचारापुर्वी तीचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटने प्रकरणी आज मंगळवार रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र मयत महिलेच्या नातेवाईकांनी तीचा मृत्यू कॉपर टी मुळे झाल्याचा आरोप केला आहे.या बाबत अहवाल मिळाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

Web Title: The victim of 'Copper T' was the victim of the bearded 'Copper T'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.