ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाआघाडीचा दणदणीत विजय विजय 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:08 PM2020-07-15T15:08:15+5:302020-07-15T16:03:04+5:30

सर्वानुमते अध्यक्षपदी पुष्पा बोर्हाडे पाटील तर उपाध्यक्षपदी विद्यमान सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली. हे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत. तर भाजपाने उमेदवार न दिल्याने या दोघांचा बिनविरोध विजय मानला जात आहे. 

The victory of the Maha aghadi in the election for the post of President and Vice President of Thane Zilla Parishad | ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाआघाडीचा दणदणीत विजय विजय 

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाआघाडीचा दणदणीत विजय विजय 

googlenewsNext

ठाणे जि. प. चे अध्यक्ष - उपाध्यक्ष बिनविरोध; शिवसेना - राष्ट्रवादीच्या महा आघाडीचा विजय ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या आजच्या निवडणुकीच्या दृष्टीने  पुन्हा शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन  महाआघाडी गठीत केली.  यासाठी ठाणे येथील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या समवेत आज सकाळी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी गठीत करण्यात आली. त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड  झाली. या निवडणुकीत भाजपाने उमेदवार दिला नाही.

 एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) तथा सभा सचिव छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.   ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा पदावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले.  ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.  

नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर  निवडुन आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.

Web Title: The victory of the Maha aghadi in the election for the post of President and Vice President of Thane Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.