शिवसेना गटनेत्याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 09:22 PM2020-02-23T21:22:48+5:302020-02-23T21:22:57+5:30

दीपिका अरोरा यांनी अपशब्द वापरल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचा अर्वाच्च शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video of abduction of Shiv Sena party leader goes viral | शिवसेना गटनेत्याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

शिवसेना गटनेत्याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Next

मीरा रोड - भर महासभेत भाजपा नगरसेविका दीपिका अरोरा यांनी अपशब्द वापरल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचा अर्वाच्च शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाईंदर पूर्वेला काशीनगर भागात एका अनधिकृत गॅरेज शेडवर पालिका कारवाई करत असताना गॅरेज चालकास आमगावकर यांनी शिवीगाळ केली.

काशीनगर भागात असलेल्या एका खासगी भूखंडावर महावीर जैन हे गॅरेज चालवतात. गॅरेज चालक जैन यांचा मूळ जमीन मालकाशी वाद सुरू आहे. जैन यांचे म्हणणे आहे की, जमीन मालकाने सदर जमीन २०१० साली भाडेतत्त्वावर दिली होती. पण नंतर २५ लाखांत खरेदी व्यव्हार ठरला व १५ लाख मालकास दिले. तसेच खरेदीखत व जमीन नावावर करून दिल्यावर उर्वरित १० लाख देणार असे ठरल्याचा दावा जैन यांनी केला. तर मूळ मालकाने मात्र असा कोणताच व्यवहार झाला नसून जैन यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचे जमीन मालकाचे म्हणणे आहे.

सदर वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. तर सदर गॅरेज शेड अनधिकृत असल्याने मंगळवारी महापालिकेने त्यावर कारवाई चालवली होती. त्यावेळी आमगावकर तेथे असताना जैन सोबत बोलाचाली होऊन अर्वाच्च शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. जमीन मालकाच्या वतीने आमगावकर कारवाई करायला लावत असल्याचे जैन यांचे म्हणणे आहे.

मी तिकडून जात असताना कारवाई होत असल्याने थांबलो. एक तर अनधिकृत शेड दुसरायाच्या जागेत बांधायची. त्यात घाण करत रहिवाशांना त्रास द्यायचा. वरुन जैन हे मला ओळखत असताना ही त्यांनी मुद्दाम माझ्याशी गैरवर्तन केल्याने आपण शिवी दिल्याचे आमगावकर यांनी मान्य केले. नुकतीच गुरुवारी महापालिकेची महासभा झाली असताना भर महासभेत भाजपाच्या दीपिका अरोरा यांनी अपशब्द वापरल्याने टीकेची झोड उठली आहे. चूक कळताच अरोरा यांनी माफी देखील मागितली.

Web Title: Video of abduction of Shiv Sena party leader goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.