VIDEO : कल्याणमध्ये भाजपा नेत्याने तलवारीने कापला केक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 06:10 PM2018-05-01T18:10:35+5:302018-05-01T18:10:35+5:30
कल्याण - देशभरात भाजपचे नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या आतातायीपणामुळे, त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप सरकार दररोज अडचणीत येत आहे. मात्र भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता तर वरिष्ठ नेत्यांचा कित्ता जिल्हा आणि शहर पातळीवरील नेतेही गिरवू लागले असून, कल्याणमध्ये एका नेत्याने चक्क तलवारीने वाढदिवसाचा केक कापला आहे.
कल्याण - देशभरात भाजपचे नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या आतातायीपणामुळे, त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप सरकार दररोज अडचणीत येत आहे. या प्रकारांमुळे विरोधी पक्षांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच खिंडीत गाठले आहे. मात्र भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता तर वरिष्ठ नेत्यांचा कित्ता जिल्हा आणि शहर पातळीवरील नेतेही गिरवू लागले असून, सत्ता आपलीच असल्याने “हम करे सो कायदा” या अविर्भावात वावरत आहेत. आज १ मे भाजप कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. काल रात्री प्रेमनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र या दरम्यान कार्यकर्त्यांसमवेत केक कापण्यासाठी म्हात्रे यांनी चक्क तलवार उगारत या तलवारीने केक कापला. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे शस्त्र बाळगणे गुन्हा असताना केवळ सत्ता धरी पक्षाचा पदाधिकारी म्हणून पोलीस म्हात्रे यांना सुट देत आहेत का? असा सवाल सर्व सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.