Video: क्रिकेट माझाही आवडता खेळ, फडणवीसांची फटकेबाजी; षटकारवर षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:05 AM2023-03-07T11:05:05+5:302023-03-07T11:06:17+5:30

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देव आहे, क्रिकेटवेड्यांचा देव आहे. भारताला कपिलच्या गोलंदाजीनं वेड लावलयं,

Video: Cricket is my favorite game too, Devendra Fadnavis' batting; Sixes on sixes in bhiwandi | Video: क्रिकेट माझाही आवडता खेळ, फडणवीसांची फटकेबाजी; षटकारवर षटकार

Video: क्रिकेट माझाही आवडता खेळ, फडणवीसांची फटकेबाजी; षटकारवर षटकार

googlenewsNext

मुंबई - राजकीय मैदानात कायम फटकेबाजी करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भिंवडी येथील खासदार महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन केलं. त्यावेळी, केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर फडणवीसांनी उत्तुंग षटकार ठोकले. फडणवीसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एकापाठोपाठ एक असे अनेक उत्तुंग शॉट्स फडणवीस लगावताना दिसत आहेत. नेहमीच राजकीय मैदानात कॅप्टन कुल भूमिका निभावणाऱ्या फडणवीसांनी भिवंडीतील मैदानावर ओपनर बनून फलंदाजी केली,  

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देव आहे, क्रिकेटवेड्यांचा देव आहे. भारताला कपिलच्या गोलंदाजीनं वेड लावलयं, सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीनं वेडं लावलयं, गांगुलीच्या षटकारांनी वेड लावलंय, सेहवाच्या धुव्वादार फलंदाजीनं वेड लावलंय. अवघ्या क्रिकेटने भारतीयांना वेड लावलंय, असं नेहमीच आपण ऐकतो. मात्र, क्रिकेटच्या या वेडापासून राजकारणीही सुटले नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीच्या खासदार महोत्सवातील केंद्रीयमंत्री पंचायत राज चषक स्पर्धेचं उद्घाटन केलं. त्यावेळी, बॅटींग करण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशीच फटकेबाजी केली होती. 


भारतातील मोठ्या प्रमाणातील लोकांचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट, मीही त्यापैकीच एक आहे, असे म्हणत फडणवीसांनी भिवंडीतील खासदार महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये, त्यांनी उत्तुंग षटकार ठोकले आहेत. फडणवीसांनी फलंदाजी पाहून अनेकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 
 

Web Title: Video: Cricket is my favorite game too, Devendra Fadnavis' batting; Sixes on sixes in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.