Vidhan sabha 2019 : अर्ज भरताना उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:25 AM2019-09-30T01:25:41+5:302019-09-30T01:25:52+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाच्या चहुबाजूने शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी शंभर मीटर परिसरात कलम १४४ ( २) अन्वये ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा कळवा या १३ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.
या १३ विधानसभा क्षेत्र कार्यालयांच्या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी आदींना बैठक, पत्रकार परिषद आदी कार्यक्र म घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कार्यालयांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात नामनिर्देशन अर्ज दाखल करणारा उमेदवार व त्याच्यासोबत चार व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार
आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणाºया उमेदवारास नमूद ठिकाणच्या कार्यालयाच्या शंभर मीटरच्या चहूबाजूकडील परिसराच्या आत फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तीनपेक्षा अधिक वाहने सदर कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश ७ आॅक्टोबर मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहणार आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला असल्याने कार्यालयातील गोंधळाचे वातावरण टाळता येणार आहे.
खर्चाच्या तक्रारीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत सहा केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरीक्षकाना भेटून संबंधित उमेदवारांच्या खर्चाबाबत तक्रार करणे शक्य होणार आहे. यासाठी नागरिकांना त्यांच्या ठिकठिकाणच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भेटता येणार आहे.
निरीक्षकांच्या वास्तव्याचे ठिकाणी नारिकांना भेटून तक्रार करता येणार आहे. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व या मतदारसंघांतील उमेदवारांची तक्रार निवडणूक खर्च निरीक्षक विवेकानंद यांना विद्युत पारेषण गेस्ट हाऊस, तळमजला, पडघा येथे दिलेल्या वेळेत भेटता येणार आहे. शहापूर, कल्याण पश्चिम, मुरबाड मतदारसंघातील उमेदवाराच्या खर्चाची तक्रार निरीक्षक आशिषचंद्र मोहंती यांना त्यांच्या सेंच्युरी रेयॉन गेस्ट हाऊस, वसंत विहार, कल्याण येथील कार्यालयात करण्याची परवानगी दिली आहे.
अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व या तीन मतदारसंघांच्या तक्रारीसाठी खर्च निरीक्षक एस.आर. कौशिक यांना आयुध निर्माणी गेस्ट हाऊस, अंबरनाथ येथील कक्ष क्रमांक ५ व ६ येथे जावून भेटता येणार आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ठाणे या मतदारसंघांतील तक्रारीसाठी शिवस्वरूप सिंग, यांना कक्ष क्र .४, डोंबिवली जिमखाना, डोंबिवली येथे संपर्क साधता येणार आहे. मीरा- भार्इंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघांतील उमेदवारांची तक्रार निरीक्षक उमेश पाठक यांच्याकडे कक्ष क्र .२७, रेमंड गेस्ट हाऊस येथे व रूम नं.२, सूर्या, शासकीय विश्रामगृह, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, ठाणे (प.) येथे करता येईल. मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या मतदारसंघांसाठी तक्रार के. रमेश यांच्याकडे नागरिकांना रूम नं.४, सिडको गेस्ट हाऊस, किल्ले गावठान बेलापूर, नवी मुंबइ, येथे जावून दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते दुपारी १२ दरम्यान करता येईल.