ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी विद्याधर ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:53+5:302021-09-27T04:44:53+5:30

ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या रविवारी पार पडलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशक विद्याधर ठाणेकर ...

Vidyadhar Thanekar as the President of Thane Marathi Granth Sangrahalaya | ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी विद्याधर ठाणेकर

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी विद्याधर ठाणेकर

googlenewsNext

ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या रविवारी पार पडलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशक विद्याधर ठाणेकर यांचा अध्यक्षपदी विजय झाला. ठाणेकर यांच्याविरोधात उभे राहिलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचा पराभव झाला असून त्यांना ७८ मते मिळाली. यावेळी १९३ सभासदांनी मतदान केले.

गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. यंदाच्या निवडणुकीत विद्याधर विरुद्ध विद्याधर असा निवडणुकीचा सामना पाहायला मिळाला होता. या निवडणुकीत एकाच नावाच्या पॅनलमध्ये दोन गट पडले होते. त्यामुळे ठाणेकर गट जिंकणार की वालावलकर गट याची चर्चा ठाण्यातील वर्तुळात रंगली होती. सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत संग्रहालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर आणि विद्याधर वालावलकर यांचे गट आमनेसामने उभे राहिले होते. ठाणेकरांच्या गटातून ते स्वतः, तर वालावलकर यांच्या गटातून करमरकर हे अध्यक्षपदासाठी उभे राहिले होते. ठाणेकर गटाकडून कार्यकारी मंडळासाठी विनायक गोखले, वृषाली राजे, केदार बापट, कृष्णकुमार कोळी, निर्मोही फडके, नरेंद्र जोशी, प्रकाश दळवी, निशिकांत महाकाळ तर वालावलकर गटाकडून कार्यकारी मंडळासाठी वालावलकर स्वतः, सीमा दामले, आशा जोशी, डॉ. अश्विनी बापट, संजीव फडके, सुजय पत्की हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणूक अधिकारी या नात्याने वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले ज्येष्ठ अधिकारी भरत अनिखिंडी यांनी काम पाहिले.

चौकट १

कार्यकारी मंडळाच्या सदस्यासाठी विनायक गोखले हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. ठाणेकर यांच्या गटातून आठपैकी सात तर वालावलकर यांच्या गटातून सहापैकी चार निवडून आले. प्रकाश दळवी, विद्याधर वालावलकर आणि आशा जोशी यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

चौकट २

२०१८ साली ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक झाली होती त्यावेळी २७९ सभासदांनी मतदान केले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा ८७ च्या संख्येने मतदान कमी झाले. कोरोनामुळे यंदा कमी मतदान झाले.

चौकट ३

उमेदवार : मते

विद्याधर ठाणेकर : ११२

अरुण करमरकर : ७८

विनायक गोखले : १४८

केदार बापट : १४०

निर्मोही फडके : १३४

नरेंद्र जोशी : १३३

वृषाली राजे : १२६

डॉ. अश्विनी बापट : १२४

निशिकांत महाकाळ : १२४

कृष्णकुमार कोळी : १२३

संजीव फडके : १२२

सुजय पत्की : ११९

सीमा दामले : ११४

प्रकाश दळवी : १०९

विद्याधर वालावलकर : १०१

आशा जोशी : ९८

--------–----------------------

माझा हा विजय दिवंगत पां. के. दातार आणि जयंत दातार यांना समर्पित करीत आहे. स्वा. सावरकर प्रतिष्ठान आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे यांच्यासह गेली अनेक वर्षे मी या संग्रहालयात ज्यांच्याबरोबर काम केले त्यांनी दिलेल्या भरघोस सहकार्यामुळे हे शक्य झाले.

- विद्याधर ठाणेकर

Web Title: Vidyadhar Thanekar as the President of Thane Marathi Granth Sangrahalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.