ठाणे जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी दक्षता समिती सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 06:19 PM2020-02-04T18:19:56+5:302020-02-04T18:26:06+5:30

 येथीन जिल्हाधिकारी कार्यालयात या दक्षता समितीची बैठक उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, परीक्षा विभागीय मंडळ सचिव संदीप संगवे, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, एस.एन. परीट आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

The Vigilance Committee alerts for the examination of two lakh students except 10th-XII in Thane district. | ठाणे जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी दक्षता समिती सतर्क

या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठीत

Next
ठळक मुद्दे१८ फेब्रुवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चाबारावी प्रमाणेच दहावीची परीक्षा २३ माचपर्यंत पार पडणार जिल्ह्यात सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा

ठाणे : दहावीची व बारावीच्या विद्यार्थ्यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा यंदा अनुक्रमे ३ मोर्च व १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या वर्षी बारावीला ९८ हजार ४२९ आणि दहावीला एक लाख २७ हजार १५६ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठीत झाली आहे. या सतिमीने मंगळवारी बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांविषयी सविस्तर चर्चा सतर्कता दाखवली आहे.
       येथीन जिल्हाधिकारी कार्यालयात या दक्षता समितीची बैठक उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, परीक्षा विभागीय मंडळ सचिव संदीप संगवे, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, एस.एन. परीट आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यंदा बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या परीक्षेला यंदा जिल्ह्यात बारावीला विज्ञान शाखेतून २९ हजार६०९, कला शाखेतून १७ हजार ४८ , वाणिज्य शाखेतून ५० हजार ८३७ आणि एम.सी.व्ही. सी शाखेचे एक हजार ३५ विद्यार्थी बसले आहेत. बारावीची ही परीक्षा १६७ परीक्षा केंद्रांवर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
         बारावी प्रमाणेच दहावीची परीक्षा २३ माचपर्यंत पार पडणार आहे. यंदा दहावीची ही परीक्षा ३३० केंद्रांवर घेतली जाणार आहे.या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भयपणे सुरळीत परीक्षा देण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाव्दारे करण्यात आल्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या परीक्षेदरम्यान अनुचितप्रकार घडू नये यासाठी सनियंत्रण पथक व गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात पाच भरारी पथकांचे गठन करण्यात आल्याचे या बैठकीत उघड झाले आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षा निकोप वातावरणात होण्यासाठी सर्व विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना भांडे पाटील यांनी केली. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना बैठे पथकांच्या निर्मितीसाठी लवकरच सुचित करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. परीक्षेच्या या कालावधीत वीज मंडळालाही वीज पुरवठा सुरळीत राहण्या बाबत सुचना देण्यात आल्या.

Web Title: The Vigilance Committee alerts for the examination of two lakh students except 10th-XII in Thane district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.