दिवा रेल्वे पोलिसांच्या सतर्कता, घरातून पळालेली मुलगी,मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन

By अनिकेत घमंडी | Published: November 6, 2023 05:46 PM2023-11-06T17:46:31+5:302023-11-06T17:47:08+5:30

डोंबिवली: मुंब्रा येथून घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीसह २१ वर्षाच्या मुलाला दिवा रेल्वे पोलिसांनी दातीवली रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर ...

Vigilance of Diva Railway Police, girl who ran away from home, girl handed over to her family | दिवा रेल्वे पोलिसांच्या सतर्कता, घरातून पळालेली मुलगी,मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन

दिवा रेल्वे पोलिसांच्या सतर्कता, घरातून पळालेली मुलगी,मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन

डोंबिवली: मुंब्रा येथून घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीसह २१ वर्षाच्या मुलाला दिवा रेल्वे पोलिसांनी दातीवली रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर झोपलेले पाहिले, त्यांची पोलिसांनी चौकशी केल्यावर अपेक्षित उत्तर न मिळाल्याने त्यांना दिवा रेल्वे पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता ते दोघे घरातून पळून आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी माहिती घेत, त्या दोघांच्या पालकांची, घराची विचारपुस करून वडिलांचे नंबर घेतले, त्यानुसार मोबाइलवर फोन करून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोघांच्याही पालकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार ४ नोव्हेंबर रोजी नोंदवली होती, मुलीच्या पालकांनी अपहरण तर मुलाच्या पालकांनी हरवले (मिसिंग) तक्रार दिल्याची माहिती मिळवली. रेल्वे पोलिसांनी दोन्ही मुले, पालकांची समजूत काढून दोघांनाही पालकांच्य स्वाधीन केले. याबद्दल दिवा रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पातळीवर कौतुक होत आहे.

Web Title: Vigilance of Diva Railway Police, girl who ran away from home, girl handed over to her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे