जिल्ह्यातील भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

By सुरेश लोखंडे | Published: September 18, 2023 08:16 PM2023-09-18T20:16:04+5:302023-09-18T20:16:24+5:30

या भातसा धरणाची पातळी आजसायंकाळी ६:३० वाजता १४१.६६ मी झाली आहे. या धरणात एकूण पाणी साठा ९६४.४५७ दलघमी व धरणातील साठयाची टक्केवारी ९८.८० टक्के आहे.

Vigilance warning to the villages along Bhatsa river in the thane district | जिल्ह्यातील भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

जिल्ह्यातील भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : जिल्ह्यातील भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. या धरणात येणार्या पाण्याचा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करणेकरिता, भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे ०.५० मी. ने उघडण्यात आलेले आहेत.

त्यातून २७२.२७ क्युमेक्स  पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील शहापूर, मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, सापगाव नदीकाठावरील इतर गावांना सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे  विभागाच्या भातसा नगरच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिल्या आहेत.
 

या भातसा धरणाची पातळी आजसायंकाळी ६:३० वाजता १४१.६६ मी झाली आहे. या धरणात एकूण पाणी साठा ९६४.४५७ दलघमी व धरणातील साठयाची टक्केवारी ९८.८० टक्के आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य पाण्याचा येवा वाढत आहे. नदीकाठावरील इतर गावांतील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या व वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आला आहेत. यासंबंधी नदी काठावरील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Vigilance warning to the villages along Bhatsa river in the thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर