ठाण्याच्या कोंडदेव स्टेडियममध्ये रंगणार विजय हजारे क्रिकेट मालिका; २३ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर खेळले जाणार सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 07:31 PM2023-11-22T19:31:01+5:302023-11-23T12:28:05+5:30
२३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत सामने खेळले जाणार आहेत.
विशाल हळदे
ठाणे : विजय हजारे यांच्या स्मरणार्थ खेळली जाणारी मानाची क्रिकेट मालिका ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गुरुवारपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत सामने खेळले जाणार आहेत. स्टेडियमवर तब्बल सहा महिन्यानंतर पहिली मँच बडोदा विरुद्ध पंजाब अशी खेळविली जाणार आहे. येथे होणारे सर्व सामने बी सी सी आय ने आयोजित केले असून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने खेळवले जाणार आहेत. भारताच्या वन डे टीमच्या खेळाडूंची निवड या सामन्यांमधून केली जाणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणाऱ्या सात सामन्यांमध्ये भारताच्या क्रिकेट संघातील बरेच नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर खेळले जाणारे सामने
- २३ नोव्हेंबर : बडोदा विरुद्ध पंजाब
- २५ नोव्हेंबर : गोवा विरुद्ध तमिळनाडू
- २७ नोव्हेंबर : बडोदा विरुद्ध नागालँड
- २९ नोव्हेंबर : प. बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश
- १ डिसेंबर : गोवा विरुद्ध नागालँड
- ३ डिसेंबर मध्य प्रदेश विरुद्ध तमिळनाडू
- ५ डिसेंबर बंगाल विरुद्ध पंजाब
- या सामन्यांसाठी मँच रेफ्री, मनु नायर- दिल्ली ( रणजी ट्रॉफी खेळाडू )
- निशित शेट्टी - मुंबई ( रणजी ट्रॉफी खेळाडू ), सत्यजीत सातभाय - महाराष्ट्र ( रणजी ट्रॉफी खेळाडू )
- २३ तारखेला होणाऱ्या मँचसाठी अभिजीत बंगरी, नितिन पंडित. विदर्भ- नागपूर हे अंपायर्स म्हणून असणार आहेत .
- या संपूर्ण सामन्यांचे व्हिडिओ अँनालिस्ट अनिल केसरकर आणि संकल्प कोळी हे करणार आहेत .
- व्हेन्यू मँनेजर म्हणून दर्शन शांताराम भोईर हे काम बघणार आहेत
- तसेच अँन्टी करप्शन अधिकारी म्हणून अरुण तावडे हे काम बघणार आहेत ,
- या सामन्यांसाठी खेळपट्टी बनवण्याचे काम बीसीसीआयचे क्यूरेटर, आणि खास हैदराबादहून बोलावण्यात आलेले चंद्रशेखर राव हे बघत आहेत .