विजू खोटे, लीला गांधी सन्मानित
By admin | Published: December 21, 2015 01:25 AM2015-12-21T01:25:45+5:302015-12-21T01:25:45+5:30
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांना या वर्षीच्या जनकवी पी. सावळाराम स्मृती तर ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना गंगा-जमुना पुरस्काराने रविवारी
ठाणे : ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांना या वर्षीच्या जनकवी पी. सावळाराम स्मृती तर ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना गंगा-जमुना पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले. या वेळी खोटे यांनी आपल्या मनोगतात ठाणे शहराचे कौतुक करत मुंबईपेक्षा ठाणे सुंदरच असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
ठाणे महापालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या वेळी विशेष उपस्थिती म्हणून सिनेदिग्दर्शक राजदत्त, महापौर संजय मोरे, जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय सावळाराम, अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे, विरोधी पक्षनेते संजय भोईर आदी उपस्थित होते.
अरुण मळेकर (साहित्यिक), सावित्री कुळकर्णी (शैक्षणिक) आणि विनय राजवाडे (उदयोन्मुख कलाकार) यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. पी. सावळाराम हे कवी असूनही जमिनीवर पाय ठेवणारे होते. गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का, हे गीत ऐकल्यावर महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील आईला उचंबळून आले आहे. पुष्कळदा माणूस गुदमरल्यासारखा, अस्वस्थ होतो. त्याला मोकळी वाट करण्याचे काम त्यांच्या गीतांनी केले, अशा शब्दांत राजदत्त यांनी भावना व्यक्त केल्या. या निमित्ताने सावळाराम यांच्या गीतावर आधारित ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.