विकासकाची ४६ कोटी ५२ लाखांची फसवणूक,दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:29 AM2018-03-11T06:29:08+5:302018-03-11T06:29:08+5:30

मुंबईतील जमीन विकासकाची ४६ कोटी ५२ लाखांची फसवणूक करणाºया कल्याणमधील बिल्डर अनिल शहा यांच्यासह त्याचा साथीदार मॅथ्यू जॉन अशा दोघांना शनिवारी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणातील आणखी चार जणांचा शोध सुरू आहे.

 Vikas's fraud worth 46 crores 52 lakh, two arrests | विकासकाची ४६ कोटी ५२ लाखांची फसवणूक,दोन अटकेत

विकासकाची ४६ कोटी ५२ लाखांची फसवणूक,दोन अटकेत

Next

ठाणे - मुंबईतील जमीन विकासकाची ४६ कोटी ५२ लाखांची फसवणूक करणाºया कल्याणमधील बिल्डर अनिल शहा यांच्यासह त्याचा साथीदार मॅथ्यू जॉन अशा दोघांना शनिवारी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणातील आणखी चार जणांचा शोध सुरू आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ट्रक टर्मिनल प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर विकसित करण्यास आपल्या कंपनीला मिळाल्याचे कल्याण येथील बिल्डर अनिल शहा याने मुंबईतील जमीन विकासकाला भासवून त्यात भागीदारी देण्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

खडकपाडा पोलिसात गुन्ह्याची नोंद

च्या प्रकल्पात भागीदारी आणि गुंतवलेल्या ४६.५२ कोटींबाबत मुंबई, गोरेगाव येथील जमीन विकासक संजय व्यास यांनी विचारणा केल्यावर त्यांना परिवारासह ठार मारण्याची धमकी शहा यांनी दिली होती. त्यानंतर, व्यास यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात तक्रार केली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला.
च्त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. शहा आणि मॅथ्यू याला अटक केल्याचे सहायक पोलीस आयुक्त एस. टी. अवसरे यांनी सांगितले.

Web Title:  Vikas's fraud worth 46 crores 52 lakh, two arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.