विकसित भारत संकल्प यात्रेमधील पंतप्रधानाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ भिवंडी, कल्याणच्या गावकऱ्यांना
By सुरेश लोखंडे | Published: November 30, 2023 06:08 PM2023-11-30T18:08:42+5:302023-11-30T18:09:38+5:30
महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि वापरण्याचे आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. या उपक्रमामुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन मिळेल.
ठाणे : दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध याेजनेच्या लाभार्थ्यांशीआज संवाद साधला आहे. या थेट प्रक्षेपणाचा लाभ जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण तालुक्यांतील गांवकऱ्यांनाही आज घेता आला आहे. त्यासाठी ग्राम पंचायतींनी खास व्यवस्था करून दिली हाेती.
महिलाभिमुख विकास सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या दिशेने आणखी एक पाऊल उचलत पंतप्रधान महिला किसान ड्रोन केंद्राचा ते शुभारंभ आज करण्यात आलेला आहे. यावेळी महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन प्रदान केले. जेणेकरून हे तंत्रज्ञान त्यांना उपजीविकेसाठी वापरता येईल. पुढील तीन वर्षांत महिला बचत गटांना १५ हजार ड्रोन पुरवले जातील.
महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि वापरण्याचे आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. या उपक्रमामुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन मिळेल. यास अनुसरून पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कल्याण तालुक्यातील काेळणी काेलम ग्राम पंचायत व भिवंडी तालुक्यात घाेटगांव येथील ग्रामस्थांनी आज नुभवले. पंतप्रधानाचे सखाेल मार्गदर्शन त्यांना या प्रक्षेपणाव्दारे ऐकता आले आहे.
आरोग्य सेवा परवडणारी असावी आणि ती सहज उपलब्ध करून देणे हा पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या दृष्टिकोनाचा पाया आहे. परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्राची स्थापना, या दिशेने उचललेल्या प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे आदी कार्यक्रमांचे यावेळी थेट प्रक्षेपण गांवकऱ्यांना ऐकला आले आहे.