भंडार्ली येथील डंपिंग ग्राऊंडला १४ गाव संघर्ष समितीचा तीव्र विरोध, ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 04:04 PM2022-01-17T16:04:59+5:302022-01-17T16:05:19+5:30

ठाणे महापालिकेच्या विरोधात ग्रामस्थांनी केले आंदोलन

Villagers rallied against the dumping ground at Bhandarli | भंडार्ली येथील डंपिंग ग्राऊंडला १४ गाव संघर्ष समितीचा तीव्र विरोध, ग्रामस्थ एकवटले

भंडार्ली येथील डंपिंग ग्राऊंडला १४ गाव संघर्ष समितीचा तीव्र विरोध, ग्रामस्थ एकवटले

googlenewsNext

कल्याण-ठाणे महापालिकेने भंडार्ली गावात चार हेक्टर जागा घेऊन त्याठिकाणी डंपिंग ग्राऊंड उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शहरातील कचरा ग्रामस्थांच्या माथी का असा संतप्त सवाल उपस्थितीत करीत १४ गाव संघर्ष समितीने या डंपिंगला तीव्र विरोध केला आहे. ठाणे महापालिकेच्या विरोधात आंदोलन करीत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनास माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह अन्य नेत्यांनी या आंदोलनास सक्रीय पाठिंबा दिला आहे.

भंडार्ली गावात ठाणे महापालिकेचा डंपिंग ग्राऊंडचा प्रकल्प नको. त्याला ग्रामस्थासह १४ गाव संघर्ष समितीने विरोध दर्शवित सरकारकडे धाव घेतली होती. सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. ग्रामस्थांचा विरोध न जुमानता ठाणे महापलिका डंपिंग ग्राऊंडचा प्रकल्प गावात राबवित असल्याच्या निषेधार्थ आज जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील, मनसेचे प्रकाश भोईर, संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर येंदालकर, जीवन वालीलकर, गुरुनाथ पाटील, विजय पाटील, चित्रा बाविस्कर आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

माजी खासदार नाईक यांना सांगितले की, ठाणे महापालिकेकडे विकासाचे व्हीजनच नाही. २५ वर्षापूर्वी या शहराचा विकास व्हायला सुरुवात झाली. तेव्हा अनेक जागा त्याठीकाणी मोकळ्य़ा होत्या. तेव्हाच त्यांनी डंपिंग ग्राऊंडसाठी नियोजन करायला हवे होते. ठाण्याच्या नेत्यांनी फक्त आणि फक्त पैसा खायचा आणि कमावायचे हेच व्हिजन ठेवले.

नगरसेवक पाटील यांनी सांगितले की, भंडार्ली गावातील ग्रामस्थांसह १४ गाव संघर्ष समितीचा या डंपिंग ग्राऊंडला विरोध आहे. माझाही विरोध आहे. नागरीकांचा विरोध असताना प्रकल्प राबविल्यास त्यावर होणारा खर्च वाया जाऊ शकतो. दर महिन्याला २२ लाख रुपये या जागेचा भाडे महापालिकेस द्यावे लागणार आहे. त्याऐवजी हा प्रकल्प अन्य ठिकाणी राबवावा. पनवेलचे उपमहापौर गायकवाड यांनी ठाण्याती नेत्यांना दूरदृष्टी नाही. अन्यथा हा प्रकल्प ग्रामस्थांच्या माथी मारला नसता. ग्रामस्थ वालीलकर यांनी यांनी सांगितले की, हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

Web Title: Villagers rallied against the dumping ground at Bhandarli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.