मेट्रो कारशेडचा सर्व्हे गावकऱ्यांनी पुन्हा उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:24 AM2020-01-07T00:24:15+5:302020-01-07T00:24:19+5:30

एमएमआरडीएच्या वतीने घोडबंदर भागातील मोघरपाडा गावात जिल्हाधिकारी कार्यालय व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात शेतक-यांना विश्वासात न घेता मेट्रो कारशेडचा सर्व्हे सुरू केला होता.

The villagers surveyed the Metro Carshed again | मेट्रो कारशेडचा सर्व्हे गावकऱ्यांनी पुन्हा उधळला

मेट्रो कारशेडचा सर्व्हे गावकऱ्यांनी पुन्हा उधळला

Next

ठाणे : एमएमआरडीएच्या वतीने घोडबंदर भागातील मोघरपाडा गावात जिल्हाधिकारी कार्यालय व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात शेतक-यांना विश्वासात न घेता मेट्रो कारशेडचा सर्व्हे सुरू केला होता. परंतु यामध्ये पुन्हा आमदार प्रताप सरनाईक आणि इतर गावक-यांनी हस्तक्षेप करून तो उधळून लावला. आधी शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांचे पुनर्वसन करा, मगच सर्व्हे करा, अशी भूमिका घेऊन जिल्हाधिका-यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
घोडबंदर रोडवरील या प्रकारानंतर एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत लोकप्रतिनिधी व शेतकºयांना विश्वासात घेऊनच सर्व्हे केला जाईल, असे आश्वासन त्यांना दिले.
ओवळा-मोघरपाडा येथे खारभूमी परिसर असून जुना सर्व्हे नंबर २८ (नवीन सर्व्हे नंबर ३०) येथे वर्षानुवर्षे शेतकरी भातशेती करतात. १८७ कुटुंबे येथे शेती करत आहेत. प्रत्यक्षात आजही शेती करणाºयांची संख्या जास्त आहे. काही लोक येथे खाडीकिनारी मासेमारी करायचे. खाडीचे भरती-ओहोटीचे पाणी शेतात यायचे व यामुळे भातशेतीचे नुकसान व्हायचे. त्यामुळे या परिसरात त्यावेळच्या सरकारने १९६० साली शेतकºयांना एक बंधारा बांधायला लावला. यामुळे जमिनीचे रक्षण होऊन शेतीचे क्षेत्र वाढले. १९६० मध्ये १६७ लोकांना भातशेती करण्यासाठी प्रत्येकी ६४ गुंठे जागा सरकारकडून देण्यात आली. इतरांना तोंडी भातशेती करण्यासाठी त्यावेळच्या अधिकाºयांनी येथील जमीन दिली, पण कसणाºया शेतकºयांच्या नावाची नोंद सरकारदरबारी पुढे झाली नाही.
>कारशेडसाठी हवी १०० एकर जागा
आता मेट्रो प्रकल्पासाठी एमएमआरडीएने मेट्रो कारशेडचे आरक्षण ओवळा-मोघरपाडा येथे खारभूमी जागेत टाकले आहे. या कारशेडसाठी सुमारे १०० एकर जागा एमएमआरडीएला हवी असून त्यासाठी त्यांचे अधिकारी सोमवारी कारशेडच्या सर्वेक्षणासाठी गेले होते. मात्र, त्यांनी कसल्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचा दावा यावेळी शेतकºयांनी केला.
यावेळी स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, युवासेनेचे रवी घरत, संजय पाटील, राम ठाकूर, आदींसह मोठ्या संख्येने गावकरी
सहभागी होते.
>कारशेडसाठी ओवळा-मोघरपाडा येथे शेतकºयांची जमीन एमएमआरडीएला हवी आहे. परंतु, त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. शेतकºयांचे समाधान करा, त्यांना न्याय द्या आणि मगच कारशेडचे काम सुरू करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: The villagers surveyed the Metro Carshed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.