गावांनी संगोपन केले... वृक्ष वाढले, जंगल बहरले

By admin | Published: December 24, 2015 01:35 AM2015-12-24T01:35:10+5:302015-12-24T01:35:10+5:30

सध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते

The villages grew up ... trees grew, the jungle grew | गावांनी संगोपन केले... वृक्ष वाढले, जंगल बहरले

गावांनी संगोपन केले... वृक्ष वाढले, जंगल बहरले

Next

राजेश जाधव,  म्हारळ
सध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते. असंख्य वाहनांची रेलचेल, बांधकामे, रासायनिक कंपन्या अशा अनेक कारणांमुळे हवेतील प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. उघड्या माथ्याचे डोंगर आता भरू लागले आहेत. संरक्षित जंगले आता घनदाट होऊ लागली आहेत. त्याचे कारण म्हणजे या भागात ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाविषयी आलेली जागरूकता आणि वन विभागाने ग्रामस्थांवरच जंगले वाचविण्यासाठी दिलेली जबाबदारी.
कल्याण तालुक्यात जळवपास सहा हजार हेक्टर जमीन वन विभागाकडे आहे. त्यामध्ये वृक्षलागवडीसारखे उपक्रम राबविले जात आहेत. वनविभागाने वृक्षलागवड केली तर ती झाडे ग्रामस्थांनी जगवायची, त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या बनविल्या असून त्यामध्ये गावकऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रात जवळपास १४ हजार गावे जंगलाला लागून आहेत. त्यामुळे जंगलतोडीपासून परावृत्त करण्यासाठी वनविभागाकडून ग्रामस्थांना मदतरूपी गॅसवाटपही करण्यात येत आहे. तालुक्यातील जंगलात ६० ते ७० टक्के वाढ झाली असून यात साग, पाईन, बांबू आणि इतर वृक्षांचा समावेश आहे.
आग लागल्यानंतर वणवा जास्त पसरू नये, त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत जाळरेषा तयार करून आता आटोक्यात आणण्याचा वन विभाग प्रयत्न करतो आहे. जंगल वाढण्याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलतोड जवळपास ९० टक्के संपुष्टात आली आहे. ग्रामीण भागामध्ये जळणाच्या फाट्यासाठी बैलगाडीसाठी आणि नांगरासाठी प्रामुख्याने जंगलतोड होत होती. पण, आता चुलीच्या ठिकाणी गॅस आल्याने फाट्यासाठी जंगल तोडणे बंद झाले आहे.
बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बैलगाडीचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. घरटी एक नांगर म्हणजे जवळपास ४ ते ५ झाडे नांगर बनविण्यासाठी शेतकऱ्यास लागत. आता मात्र त्या ठिकाणी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होऊ लागल्याने त्याच्यासाठी होणारी जंगलतोडही थांबली आहे. त्याच्या परिणामामुळे जिकडे पाहावे तिकडे हिरवाई दिसू लागली आहे. हा पर्यावरणासाठी शुभसंकेत म्हणावा लागेल.

Web Title: The villages grew up ... trees grew, the jungle grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.