पंडित भीमसेन जोशी यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो - विनायक टोरवी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 03:24 PM2018-02-05T15:24:16+5:302018-02-05T15:28:14+5:30

भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार विनायक टोरवी यांना प्रदान

Vinayak Torvi received Pandit bhimsen joshi award | पंडित भीमसेन जोशी यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो - विनायक टोरवी

पंडित भीमसेन जोशी यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो - विनायक टोरवी

Next

डोंबिवली - 'पंडित भीमसेन जोशी हे फार कमी बोलत असत. परंतु त्यांचा एक-एक शब्द हा नेहमी एव्हरग्रीन होता. गायनाचा सराव हा 24 तास केला पाहिजे, असे ते सांगत असतं. चांगल्या गायकीसाठी मानसिक (मेन्टली) सरावाची गरज असते. आपण केवळ गात राहायचे मग सूर आपोआप मिळतात. त्यांनी सांगितलेल्या या मार्गावर मी चालत आहे'', असे मत सुप्रसिद्ध हिंदुस्थानी गायन क्षेत्रातील कलाकार विनायक टोरवी यांनी व्यक्त केले. 

जी.एस. बी. मंडळ यांच्यातर्फे कै. पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने पं. भीमसेन जोशी स्मृती संगीत समारोहचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत संगीत क्षेत्रातील विशेष करून पंडितजींचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करून त्याला पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा पुरस्कार हा पंडित टोरवी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. टोरवी म्हणाले, या पुरस्काराचा मी आनंदाने स्वीकार करीत आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी माझ्या गुरूंचा आशीवार्द आहे. रामायणात जसा राम हा अवतार पुरूष होता. त्याप्रमाणे पं. भीमसेन जोशी हे देखील एक अवतार पुरूष आहेत. त्यांच्या सारखा गाणारा कुणी झाला नाही आणि कुणी होणार ही नाही. गुरूजींचे गाणे हे वेगळे होते. जयपूर, किराणा अशी संगीतात खूप घराणे आहेत. पण पंडितजी स्वत:चा एक घराणो होते. त्यांचे शास्त्रीय संगीत लोकप्रिय होते. म्हणूनच त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अश्या या माङया गुरूसाठी माङयाकडे शब्दच नाहीत. माझ्या आई-वडिलांचा आणि गुरूचा आशीवार्द माझ्यामागे आहे. म्हणून मी येथेपर्यंतचा प्रवास करू शकलो. पंडितजी सारखा दुसरा कुणी ही नसल्याने त्यांच्यासारखे गाणं गळ्यात आणायचा प्रयत्न करीत आहे, असे ही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजेश पडियार यांनी अजित कडकडे यांचा कन्नड अभंग गजमुखाने जय तू गण ना धरे हा अभंग सादर केला.

त्यानंतर संत पुरंदर दासाचे भजन सादर केले. कृष्णाच्या लीला सांगणारे कन्नड भजन सादर केले. कविता शेनॉय यांनी संत तुकाराम यांनी लिखाण केलेले ‘बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव’ हा अभंग सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अनंत भट यांची रचना असलेली जय सुधीनेंद्र हा गुरूस्तूती करणारा अभंग सादर केला. संत एकनाथचा या पंढरीचे सुख पाहता डोळा हे गीत सादर करून उपस्थितांना जिंकून घेतले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विनायक टोरवी यांनी पुराया कल्याण हा राग सादर केला. 

टोरवी यांना दत्तात्रय वेलणकर, सिद्धार्थ दणमून यांनी साथ दिली. टाळ मंजिरा रविंद्र शेनॉय, तबला सत्यविजय भट, संवादिनी प्रसाद कामत, पंखवाज शिवाजी बुधकर यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय बाळ यांनी केले.

2022 मध्ये महोत्सव होणार तीन दिवसीय
जीएसबी मंडळ ही संस्था गेल्या 36 वर्षे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम आयोजित करीत असते. संगीत क्षेत्रात गेल्या आठ वर्षापासून पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान वृध्दींगत होण्यासाठी संगीत समारोह आयोजित करीत आहे. 2022 मध्ये हा महोत्सव तीन दिवसीय करण्याचा मानस संस्थेच्या सुधीर नाईक यांनी व्यक्त केला.

Web Title: Vinayak Torvi received Pandit bhimsen joshi award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.