संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांत केली १५०७ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 12:04 AM2020-04-29T00:04:34+5:302020-04-29T00:07:57+5:30

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ५०७ वाहन चालकांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांमध्ये कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख दहा हजार ६०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

 Violation of curfew: Thane Rural Police took action on 1507 vehicles in three days | संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांत केली १५०७ वाहनांवर कारवाई

पाच लाख १० हजारांचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देपाच लाख १० हजारांचा दंड वसूल ३६७ आरोपींवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी २४ ते २६ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये १५०७ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पाच लाख दहा हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हयात संचादबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. ठाणे ग्रामीण भागातील मीरा रोड, भार्इंदर, गणेशपूरी, शहापूर आणि मुरबाड या पाचही उपविभांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळया ठिकाणी २४ ते २६ एप्रिल २०२० या कालावधीमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाºया १५०७ चालकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करुन दंडही वसूल केला आहे. दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तीन दिवसांच्या काळात ३६७ आरोपींविरुद्ध ५५ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडूनही स्थानिक पोलिसांनी २३ वाहने जप्त केली. याशिवाय, कोरोनाच्या संदर्भातील अफवा पसरविणाºया सहा जणांविरुद्ध नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये, संचारबंदीचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

 

 

Web Title:  Violation of curfew: Thane Rural Police took action on 1507 vehicles in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.