मनाई आदेशाचे उल्लंघन, ८१ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:15 AM2021-03-13T05:15:02+5:302021-03-13T05:15:02+5:30
कल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पोलीस आणि केडीएमसी प्रशासन आक्रमक झाले आहे. मागील दोन दिवसांत मनपा क्षेत्रात ...
कल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पोलीस आणि केडीएमसी प्रशासन आक्रमक झाले आहे. मागील दोन दिवसांत मनपा क्षेत्रात मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, याबरोबरच ठरावीक वेळेत दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतानाही त्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
दुकाने उशिरापर्यंत उघडी ठेवणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या प्रकरणी बुधवारी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात १०, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात १, मानपाडा पोलीस ठाण्यात ३, रामनगर पोलिसात १४, विष्णूनगरमध्ये आठ, अशा एकूण ३६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तर विहित वेळेत दुकाने बंद न करून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बाजारपेठ पोलीस ठाण्यात १५, खडकपाडा पोलीस ठाण्यात आठ, अशा २३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. गुरुवारी झालेल्या कारवाईत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चार, मानपाडा पोलीस ठाण्यात एक, विष्णूनगर पोलीस ठाण्यात एक, अशा सहा गुन्ह्यांची नोंद झाली. तर, निर्बंध घालूनही वेळेत दुकाने बंद न करून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बाजारपेठ पोलिसात दोन, कोळसेवाडी पोलिसात १३, खडकपाडा पोलिसात एक, अशा १६ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------