संचारबंदीचे उल्लंघन: १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: March 31, 2020 09:06 PM2020-03-31T21:06:34+5:302020-03-31T21:09:34+5:30
गेल्या आठवडाभरामध्येसंचारबंदीचे उल्लंघन करण-या १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. संचारबंदीच्या काळामध्ये बेकायदेशीरपणे नागरिकांची वाहतूक करणा-या १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: संचारबंदीचे उल्लंघन करण-या १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवडाभरामध्ये कारवाई केली आहे. नागरिकांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणा-या १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना - कोवीड १९ या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील तसेच पाचही विभागांचे पोलीस उपअधीक्षक हे अचानक भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. २२ मार्च ते २९ मार्च या आठ दिवसांमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाºया १७७ जणांविरुद्ध कलम १८८ नुसार कारवाई केली आहे. वेगळे राहण्याचे आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणाºया एकाविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाहेर जाणाºया १०० मजूरांना कल्याण तालुका तर ४८ मजूरांना कसारा पोलिसांनी या काळात पकडले. त्यांना पुन्हा आपल्या घरी पाठविण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळामध्ये बेकायदेशीरपणे नागरिकांची वाहतूक करणाºया १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
आतापर्यंत ४४५ व्यक्तींना ठेवले विलगीकरणात
ठाणे ग्रामीण भागातील ४४५ व्यक्तींना गेल्या आठवडाभरामध्ये वेगळे (क्वारंटायर) राहण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये काशीमीरा भागात सर्वाधिक म्हणजे १४६ त्यापाठोपाठ नवघरमध्ये ११५ तर मीरा रोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ९२ जणांना विलगीकरणामध्ये ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.