ईव्हीएमच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:05 AM2019-06-18T00:05:24+5:302019-06-18T00:05:46+5:30

ईव्हीएम मशीनचा वापर रद्द करण्याची मागणी करीत अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला.

Violence against the EVMs of the Bahujan Samaj Party | ईव्हीएमच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

ईव्हीएमच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

googlenewsNext

अंबरनाथ : ईव्हीएम मशीनचा वापर रद्द करण्याची मागणी करीत अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला. यावेळी तहसीलदारांची भेट घेऊन निवडणुकीत ईव्हीएम यंत्र न वापरण्याबाबतची सूचना करून संबंधित पत्र शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदारांची भेट घेत ईव्हीएम यंत्राद्वारे निवडणुकीची प्रक्रिया न घेण्याची मागणी केली. तहसिलदार कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बहुजन आघाडीच्या वतीने आघाडीच्या घटक पक्षांनाही आमंत्रित केले होते.

उल्हासनगर : ‘ईव्हीएम मशीन हटाव, देश बचाव’ अशा घोषणा देऊन भारिप बहुजन वंचित आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन ईव्हीएम मशीनचा निषेध केला.
भारत लोकशाहीचा देश असून लोकशाहीर नागरिकांचा विश्वास हेच अंतिम सत्य आहे. प्राप्त निवडणूक प्रणालीत ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणूका आणि त्यांच्या आकडेवारीमध्ये होणारी तफावत यामुळे लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास ढळत असून, त्याबाबत शंका निर्माण होत आहे. जगातील सर्व प्रगत देशांनी ईव्हीएम मशीन नाकरली असून भारत सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगच याचा का आग्रह धरत आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचे मत पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर बागूल यांनी यावेळी व्यक्त केले.

भार्इंदरमध्ये ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’
भार्इंदर : भारिप पुरस्कृत वंचित आघाडीच्या वतीने मतदानासाठी वापरली जाणारी ईव्हीएम यंत्र पद्धती हटवण्यासाठी सोमवारी भार्इंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नगर) भवन बाहेर निदर्शने करण्यात आली. ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’, अशा घोषणा देत देशभरात मोदी आणि भाजप विरोधाची लाट असताना गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा कशा जिंकल्या? असा सवाल करत देश वाचवायचा असेल तर ईव्हीएम हटवून मतिपत्रकेचा वापर पुन्हा सुरु झाला पाहिजे अशी मागणी भारिपसह वंचित आघाडीतील सुनिल भगत, महेन्द्र कांबळे, के.के ठोकळ, रोहीत आसले, सुमीत जामनिक, संभाजी चिकटे, अ‍ॅड. यशवंत गायकवाड, वसंत कांबळे, सलीम खान, संगीता खडसे, अमिता धारस्कर आदींसह कार्यकर्त्यांनी केली. या वेळी मंडळ अधिकाºयास निवेदन देण्यात आले.

Web Title: Violence against the EVMs of the Bahujan Samaj Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.