संकेत देशपांडे यांना ठाण्यातील संगीत कट्ट्यावर गाण्याच्या माध्यमातून वाहिली आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:11 PM2018-08-18T15:11:58+5:302018-08-18T15:14:13+5:30
अभिनय कट्ट्यानंतर ठाण्यातील संगीत कट्ट्यावरहि संकेत देशपांडे यांना गाण्याच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.
ठाणे : संगीत कट्ट्यावर संकेत यांना आदरांजली वाहताना संगीत कट्ट्याच्या गायकांनी मैत्रीवर आधारित विविध गाणी गायली. या प्रसंगी रसिक आणि कलाकार संकेतच्या आठवणीत भावुक झाले होते.या वेळी संकेतने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती चित्ररूपात दाखवण्यात आली.तसेच संकेतने साकारलेल्या विविध भूमिका लोकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून संपूर्ण व्यासपीठावर संकेत च्या विविध पात्रांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. या प्रसंगी संकेत वर प्रेम करणारे असंख्य रसिक उपास्थित होते.संकेतच्या आठवणीत ज्येष्ठ नागरिक हि भावुक झाले होते. यंदाचा हा १७ क्रमांकाचा कट्टा होता.
अभिनय कट्ट्याची मुहूर्त मेढ रोवल्यापासून ते तीनशेहून अधिक कट्टे यशस्वी करणारा हरहुन्नरी कलाकार "संकेत देशपांडे" याच्या आकस्मित जाण्याने अभिनय कट्टा तसेच नाट्यसृष्टीचे फार मोठे नुकसान झाले आहे.एक उत्तम लेखक,दिग्दर्शक,कलाकार, साहित्यिक आणि त्याहीपेक्षा एक चांगला माणूस म्हणून संकेतची ओळख होती.या शब्दांत अभिनय कट्याचे सर्वेसर्वा किरण नाकती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात "ये दोस्ती हम नही तोंडेंगे" बेहती हवा सा था वो" "जब दर्द नही था "चलते चलते" तसेच तेरे जैसा यार कहा" हि अजरामर गाणी गात संकेतच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.विनोद पवार,किरण म्हापसेकर,राजू पांचाळ,निशा पांचाळ,ज्ञानेश्वर मराठे,प्रणव कोळी,सायली अंगणे, श्रेया वरे या कलाकारांनी गाणी सादर केली. "जिंदगी का सफर है ये" आणि "रूठ के हमसे कहि" हि गाणी गात विनोद पवार यांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. या कट्ट्याचे निवेदन कदिर शेख, आदित्य नाकती यांनी केले.दीपप्रज्वलन ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी दाभोळकर यांनी केले.कदिर आणि आदित्य यांनी निवेदनाच्या माध्यमातून संकेत चा अभिनय क्षेत्रातील जीवन प्रवास उलघडला.संकेत देह रूपाने जरी आपल्यातून गेला असला तरी कलाकार म्हणून तो आपल्या सोबत नेहमीच असेल अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या वेळी संकेत च्या स्मरणार्थ "संकेत देशपांडे ग्रंथ संग्रहालय" आपण सुरु करणार अहोत याची आठवण आयोजक किरण नाकती यांनी करून दिली.