पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची आजीबार्इंच्या शाळेला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:07 AM2019-12-24T02:07:42+5:302019-12-24T02:07:59+5:30

गावांची केली पाहणी : ग्रामीण भागाच्या अभ्यास दौऱ्यात जाणून घेतल्या समस्या ; ग्रामस्थांसह आजीबार्इंशी साधला संवाद

Visit of journalism students to grandparents' school | पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची आजीबार्इंच्या शाळेला भेट

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची आजीबार्इंच्या शाळेला भेट

googlenewsNext

ठाणे : पत्रकारिता अभ्यासक्र माच्या विद्यार्थ्यांनी मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील आजीबार्इंच्या शाळेला भेट देत तेथील आजीबार्इंशी संवाद साधला. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दौरा आयोजिला होता.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संचालित पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ठाणे ग्रामीण भागाचा अभ्यास दौरा करून तेथील जनजीवन, आदर्श गाव योजना ग्रामपंचायत आदींची पाहणी केली. या दौºयासाठी ठाणे जिल्हा परिषद, आजीबार्इंच्या शाळेचे जनक योगेंद्र बांगर, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय तसेच पत्रकारिता अभ्यासक्रमाचे संयोजक शशिकांत कोठेकर, सहायक आकाश ढवळ, ठाणे जिल्हा परिषद जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण यांचे सहकार्य लाभले. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे-इंगळे, समाजकल्याण खाते मुंबई सहायक आयुक्त समाधान इंगळेदेखील अभ्यास दौºयासाठी सहभागी झाले होते.

वयाची तमा न बाळगता भादाणे येथील शाळेत उत्साहाने शिक्षण घेणाºया गावातील सुमारे ३० आजीबाई. केवळ अभ्यासच नाही तर दौºयासाठी येणाºया प्रत्येकाजवळ त्या आपले अनुभव उत्सफूर्तपणे सांगतात.

असा झाला शिरवाडीचा कायापालट
सुरुवातीला धसईजवळील शिरवाडी या केवळ ३५ कुटुंबे असलेल्या आदिवासी पाड्याला भेट देऊन आदर्श गाव म्हणून त्याचा गावकऱ्यांनी कसा कायापालट केला, ते जाणून घेत त्याची पाहणी विद्यार्थ्यांनी केली.

एकेकाळी पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावात आता बोअरवेलला मे महिन्यातही पाणी असते. गावात कुºहाडबंदी असून प्रत्येक घरात शौचालय, शोषखड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे. गावात सोलर दिवे बसवले आहेत.

विद्यार्थ्यांनी दुपारच्या सत्रात मुरबाड तालुक्यातील भादाणे गावात ज्येष्ठ महिलांसाठी चालवण्यात येत असलेल्या आजीबार्इंच्या शाळेला भेट दिली. एकेकाळी अक्षरओळखही नसलेल्या निरक्षर ३० आजीबाई शाळेत शिकत आहेत.

Web Title: Visit of journalism students to grandparents' school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.