खासदारांव्दारे विहिगांवच्या सोयीसुविधांचा लोकार्पणसोहळा; केंद्रीय मंत्री अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 07:18 PM2018-08-25T19:18:02+5:302018-08-25T19:25:41+5:30

सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत पहिल्या टप्यात शहापूरच्या विहिगांव या अतिदुर्गम भागातील व डोंगर पठारावरील गावाची निवड सहस्त्रबुध्दे यांनी केली आणि त्याचा विकास साधला. दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आणि आता हे गाव जगाच्या संपर्कात आले. कृषीच्या आत्मा योजनेव्दारे ५० एक शेतीमध्ये शेंद्रीय तांदूळ उत्पादन घेण्यात आले आदी ६८ विकास कामांच्या आराखड्याव्दारे या गावाचा विकास सहस्त्रबुध्दे यांनी साधला.

Visitors to Viigao's facility; Union Minister absent | खासदारांव्दारे विहिगांवच्या सोयीसुविधांचा लोकार्पणसोहळा; केंद्रीय मंत्री अनुपस्थित

सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांनी शहापूर तालुक्याच्या दुर्गमभागातील् विहिगांव दत्तक घेतले

Next
ठळक मुद्दे६८ विकास कामांच्या आराखड्याव्दारे या गावाचा विकासपरिसरातील शेतीमधून २०२२पर्यंत कसे दर्जेदार उत्पादन घेता येईल, त्याविषयीची पत्रिका शेंद्रीय शेतीचे रिपोर्टकार्ड शेतकऱ्यांना वाटप नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर

ठाणे : सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांनी शहापूर तालुक्याच्या दुर्गमभागातील् विहिगांव दत्तक घेतले आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग या गावास शनिवारी भेट देणार होते. अखेर त्यांच्या अनुपस्थितीत विहिगावच्या सोयी सुविधांचा लोकार्पण सोहळा सहस्त्रबुध्दे यांच्यासह खासदार कपील पाटील, ग्रामविकास समाजसेवक पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.
या सोयीसुविधांच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी सुमारे वीस दिवस आधी ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. केंद्रीय ग्राम विकास मंत्र्या उपस्थितीत हा सोयीसुविधा लोकार्पण सोहळा पार पडणार होता. पण काही अपरिहार्य कारणास्तव ते येऊ शकले नाही. यामुळे या गावातील विकास कामाच्या समारोप व सोयीसुविधांचे लोकार्पण आज करण्यात आले. सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत पहिल्या टप्यात शहापूरच्या विहिगांव या अतिदुर्गम भागातील व डोंगर पठारावरील गावाची निवड सहस्त्रबुध्दे यांनी केली आणि त्याचा विकास साधला. दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आणि आता हे गाव जगाच्या संपर्कात आले. कृषीच्या आत्मा योजनेव्दारे ५० एक शेतीमध्ये शेंद्रीय तांदूळ उत्पादन घेण्यात आले आदी ६८ विकास कामांच्या आराखड्याव्दारे या गावाचा विकास सहस्त्रबुध्दे यांनी साधला.
योगायोगाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. यावेळी येथे उत्पादीत केलेले शेंद्रीय तांदूळ सॅम्पलचे वाटप करण्यात आले. लॅबव्दारे तयार केलेले येथील शेंद्रीय शेतीचे रिपोर्टकार्ड शेतकऱ्यांना वाटप केले. या परिसरातील शेतीमधून २०२२पर्यंत कसे दर्जेदार उत्पादन घेता येईल, त्याविषयीची पत्रिका यावेळी संबंधीत शेतकऱ्यांना दिल्याचे आत्मा प्रकल्प संचालक पी.एम.चांदवडे यांनी लोकमतला सांगितले. याशिवाय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाव्दारे अवजारे बँकेव्दो महिला बचत गटाना साहित्य वाटप केले. पावरट्रीलर, ट्रॅक्टर, कापणी यंत्राचे वितरण केले.
यावेळी पोपटराव पवार यांनी ग्रामीण उत्पानावर आधारीत उद्योगधंदे व विकास याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक भीमनवार, विभागीय कृषीसहसंचालक विकास पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक माने,कृषीविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे आदींसह गावकरी मोठ्यासंख्येने उपस्थित हाते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षा रोपण कार्यक्रम पार पडला. तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये शेतकरी दिन उत्साहात साजरा झाला. महिला बचतगट मळाव्यांसह विविध कार्यक्रम पार पडले. शेती उत्पादनासह योजनांची यावेळी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

Web Title: Visitors to Viigao's facility; Union Minister absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.