रोटरीच्या बुद्धीबळ स्पर्धेला विश्वनाथन आनंद यांची हजेरी, एकाच वेळी २२ बुद्धीबळपटूंशी लढत
By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 15, 2023 02:50 PM2023-08-15T14:50:53+5:302023-08-15T14:53:04+5:30
रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय उपक्रमात 500 जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे : ग्रॅण्डमास्टर पद्मविभूषण विश्वनाथन आनंद आज 15 ऑगस्ट रोजी ठाण्यात आले असून, एकाच वेळी २२ बुद्धीबळपटूंना त्याच्यासोबत सामना करण्याची संधी मिळाली आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय उपक्रमात 500 जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
टिपटॉप प्लाझा येथे सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याच दिवशी दुपारी २ वाजता विश्वनाथन विरुद्ध २२ हा प्रदर्शनीय सामना कोरम मॉलमध्ये येथे रंगला आहे.
ठाणे : ग्रँडमास्टर पद्मविभूषण विश्वनाथ आनंद आज ठाण्यात कोरम मॉल येथे २२ स्पर्धकांशी एका वेळेला बुद्धिबळ खेळताना... #ViswanathanAnand#thanepic.twitter.com/Ox9BlQdj5G
— Lokmat (@lokmat) August 15, 2023
सुमारे अडीच लाख रुपयांची बक्षिसे आणि 80 मानचिन्हे देऊन फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. रोटरीच्या या उपक्रमासाठी ग्रँड मास्टर विष्णू प्रसन्न, अभिजीत कुंटे, दीपेश चक्रवर्ती, इंटरनॅशनल मास्टर रत्नकिरण, शरद टिळक, विक्रमादित्य कुलकर्णी, कुशाग्र कृष्णत्तर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे आदी उपस्थित आहेत.