विवेक पंडितांना १४ दिवसांची कोठडी
By admin | Published: April 27, 2017 11:44 PM2017-04-27T23:44:56+5:302017-04-27T23:44:56+5:30
श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित ह्यांच्या विरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये बुधवारी गुन्हा दाखल झाल्या नंतर आज त्यांनी बँजो च्या
हितेन नाईक / पालघर
श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित ह्यांच्या विरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये बुधवारी गुन्हा दाखल झाल्या नंतर आज त्यांनी बँजो च्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत, वाजत गाजत पोलीस स्टेशन मध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्यासह स्वत:ला अटक करवून घेतली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी जमीनासाठी अर्ज सादर न केल्याने न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
माजी आमदार विवेक पंडित आणि त्यांच्या समर्थकांनी सोमवारी आयोजित केलेल्या डोहाळजेवण आंदोलनाच्या दरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून आपल्याला कार्यालयात धक्काबुक्की केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी पालघर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती. ह्या प्रकरणी पो.नि. संजय हजारे यांनी विवेक पंडित आणि त्यांच्या १८ कार्यकर्ते सह अन्य १९ लोकांविरोधात सरकारी कामात अडथळे निर्माण करणे, बेकायदा जमाव जमवणे ई. कलमासह गुन्हा दाखल केला होता. कुपोषण, भूकबळीने होणारे बालकांचे मृत्यू आणि त्यांना सेवा पुरविणाऱ्या अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनिसांना ५-५ महिने न मिळणाऱ्या मानधना बाबत विचारणा करण्यासाठी जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी ह्यांच्या कार्यालयात गेलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्या सोबत केलेले वर्तन हे महाभारतातील द्रौपद्रीचे वस्त्रहरणा प्रमाणे असून तर प्रत्येक युगात सीतेला सत्व परीक्षा द्यावी का लागते? अशी पोस्ट ह्या आंदोलना बाबत टाकण्यात आल्याने विवेक पंडित आणि निधी चौधरी ह्यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. त्यातच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी निषेध मोर्चे काढून काम बंद आंदोलन सुरू करून पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रशासन आणि श्रमजीवीच्या ह्या भांडणात पोलिसांची गोची झाली होती. निधी चौधरी ह्यांना तक्रार देण्याबाबत विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र दुसऱ्या दिवशी अचानक तक्र ार दाखल करण्यात आल्याने हा माझ्या विरोधात कट असल्याचे पंडित ह्यांनी सांगितले. (वार्ताहर)