‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषद, आज होणार प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 08:26 AM2023-02-03T08:26:42+5:302023-02-03T08:27:14+5:30

Maharashtra News: संत तुकाराम यांचा नुकताच अपमान करण्यात आला आहे. वांरवार महापुरुषांचे अपमान केले जात आहेत. महापुरुषांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण केले जात आहे. हा एक प्रकारचा कट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

'Voice of Bahujan, Samman Maharashtra' conference will start today | ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषद, आज होणार प्रारंभ

‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषद, आज होणार प्रारंभ

Next

ठाणे  : संत तुकाराम यांचा नुकताच अपमान करण्यात आला आहे. वांरवार महापुरुषांचे अपमान केले जात आहेत. महापुरुषांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण केले जात आहे. हा एक प्रकारचा कट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

त्यामुळे महाराष्ट्राला खरा इतिहास सांगण्यासाठी ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषद संपूर्ण राज्यभर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची सुरुवात शुक्रवारी पुण्यातून होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली, तर हे अराजकीय व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धिरेंद्र याने तुकाराम महाराजांचा अपमान केला असून, तो चप्पल खाण्याच्या लायकीचा आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी उपहासात्मक बोलून त्यांचा अपमान करायचा आणि महापुरुषांचा इतर कुणाशी तरी तुलना करायची, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला खरा इतिहास सांगण्याची गरज असून, त्यासाठी ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्र’ परिषद राज्यभर घेण्यात येणार आहे. या परिषदांमध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, वैशाली डोळस आणि संभाजी भगत हे सहभागी होणार असून, हे अराजकीय व्यासपीठ असेल.  

पुरोगामी नेते नास्तिक, हे असत्य
उद्या पुण्यातील टिळक स्मारक परिसरात ही परिषद होणार आहे.  इतर परिषदांमध्ये अमोल मिटकरी हेही सामील होणार आहेत, असेही आव्हाड म्हणाले. राज्याची संत परंपरा पुढे समाजसुधारकांच्या हाती गेली आणि त्याचा टप्पा म्हणजेच फुले दाम्पत्य. त्यामुळेच भिडे वाड्यात नतमस्तक होऊन त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन या परिषदेत सामील होणार आहे. पुरोगामी नेते नास्तिक असतात, असे सातत्याने बोलले जाते. पण, ते सत्य नाही.

Web Title: 'Voice of Bahujan, Samman Maharashtra' conference will start today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.