महिलांचा दारूबंदीसाठी आवाज
By admin | Published: October 12, 2015 04:41 AM2015-10-12T04:41:29+5:302015-10-12T04:41:29+5:30
सक्षम ग्रामपंचायतीचा गवगवा करणारे पुढारी किन्हवली परिसरात दारूबंदीसाठी वारंवार दुतोंडी भूमिका बजावत असल्याने नारायणगाव आणि मळेगाव या गावातील महिलांनी गावठी
किन्हवली : सक्षम ग्रामपंचायतीचा गवगवा करणारे पुढारी किन्हवली परिसरात दारूबंदीसाठी वारंवार दुतोंडी भूमिका बजावत असल्याने नारायणगाव आणि मळेगाव या गावातील महिलांनी गावठी दारूच्या बंदीसाठी आवाज उठविला असून या मेळाव्याला १२ बचत गटांसह १३५ महिलांनी सहभाग नोंदविला.
दारूबंदीच्या या मेळाव्याला गावातील सरपंच, उपसरपंच मोठ्या मुश्किलीने हजर राहिल्याचे महिलांचे म्हणणे आहे. गावचे पोलीस पाटील उपस्थित होते, मात्र निमंत्रणपत्र देऊन पोलीस प्रशासन गैरहजर राहिले. त्यामुळे गावातील महिलांसह ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मळेगाव व नारायणगाव येथील महिलांनी ग्रामसभेत वारंवार प्रोसिडिंगला नोंद करूनही संबंधित पंचायत काणाडोळा करत असल्याचे महिलांनी सांगितले. अखेर, तक्र ारी करूनही गावठी दारू बंद न झाल्याने महिलांनीच सभा बोलवून दारूबंदीसाठी हा मेळावा घेतल्याची माहिती विलास शिर्के यांनी दिली.
या मेळाव्यात महिलांतर्फे ६ ठराव करण्यात आले. त्यात दोन्ही गावांतील दारूबंदी करणे, कोणीही व्यक्ती दारूपार्सल घेऊन आल्यास एक हजार रुपये दंड, दारू पकडून देणाऱ्यास ५०० रु . इनाम, सार्वजनिक कार्यक्र मात कोणतीही व्यक्ती दारू पिऊन आल्यास कायदेशीर कारवाई करणे, धार्मिक सणाच्या दिवशी मच्छी, मटण यांची दुकाने बंद राहतील, आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)